ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, (horoscope) ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी
नवीन लोकांशी संपर्क वाढेल. घरी पाहुण्यांचे आगमन होणार आहे. (horoscope) त्यामुळे तुम्हाला जीभेवर संयम ठेवावा लागेल. विनाकारण वाद घालू नका. नाही तर नात्यात अडचणी येतील. तुमची लाइफस्टाईल सुधारेल. कुणाला उधार दिली असेल तर ती मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे. आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमचं अनेक वर्षापासून थांबलेलं काम आज मार्गी लागेल.
वृषभ राशी
काही संवेदनशील गोष्टींबाबत सावधानता बाळगा. शेअर बाजारात गुंतवणूक करताना विचार करूनच निर्णय घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करणं कधीही योग्य. बँकिंग क्षेत्रातील लोक आज बचत योजनांकडे लक्ष देतील. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील.
मिथुन राशी
एखाद्या प्रकरणात कुणाच्याही सल्ल्याने चालू नका. नाही तर अडचणींचा डोंगर उभा राहील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना मित्रांची मोठी मदत होईल. दूर राहत असलेल्या एखाद्या नातेवाईकाकडून आनंद वार्ता येण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढउतार पाहायला मिळेल. मात्र, त्याने खचून जाऊ नका. अधिक मेहनत घ्या. एखाद्या जुन्या चुकीतून काही तरी धडा घेतला पाहिजे. नाही तर तुमच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहील.
कर्क राशी
आर्थिक संधींवर तुम्हाला विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. आततायीपणे निर्णय घेतल्यास मोठी संधी हातून जाण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला घरात सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. मात्र, तुमचा हा प्रयत्न अयशस्वी होईल. तुम्ही तुमच्या कामाचं रुटीन तयार करून त्यानुसार कामे मार्गी लावा. दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यास तुमची कामे मार्गी लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तुमच्यासमोर समस्या वाढू शकतात.
सिंह राशी
आजचा दिवस तुम्हाला उन्नती देणारा असेल. बिझनेसचा एखादा प्रस्ताव घेऊन तुम्ही बाहेरच्या व्यक्तीकडे गेल्यास त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. मात्र, दुसऱ्या मार्फत प्रस्ताव पाठवल्यास नकारात्मक परिणाम येण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी पुन्हा पुन्हा त्याच चुका करणं टाळावं, नाहीतर नोकरी धोक्यात येऊ शकते. आज तुम्ही तुमच्या अनुभवाचा संपूर्ण लाभ उचलाल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याने तुम्ही प्रसन्न राहाल.
कन्या राशी
तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यवसायात तुम्ही पुन्हा एकदा दीर्घकालीन योजना सुरू कराल. व्यवसायात एकाहून अधिक स्त्रोत निर्माण झाल्याने तुम्ही प्रसन्न व्हाल. पण तुम्ही तुमच्या कामांपेक्षा इतरांच्या कामांवर अधिक लक्ष द्याल. (horoscope) त्यामुळे तुमची काही कामे लटकू शकतात. तुम्ही कोणती परीक्षेची तयारी केलेली असेल तर आज तुम्हाला त्यात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज तुमच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. पहिली म्हणजे तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. दुसरी म्हणजे तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आहे. या दोन्ही घटनांमुळे तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही.
तुळ राशी
आज तुमचा दिवस संमिश्र असा जाईल. तुम्हाला आज जीवनसाथीची साथ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या व्यवसायाची सुरुवात होणार असल्याने घरात आनंदी वातावरण असणार आहे. विदेशात व्यापार सुरू करण्याचा जे लोक प्लान करत आहेत, त्यांचा प्लान आज यशस्वी होणार आहे. एखादं काम पूर्ण न झाल्याबद्दल नैराश्य येण्याची शक्यता आहे. पण घाबरून जाऊ नका. सर्व काही नीट होईल. आरोग्याची समस्या डोकं वर काढेल. पोटाच्या विकारावर त्वरीत उपचार घ्या.
वृश्चिक राशी
आजचा दिवस बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत चांगला जाणार आहे. दाम्पत्य जीवनात सुख समृद्धी मिळेल. तुमच्या जीवनसाथीची तुम्हाला खंबीर साथ मिळेल. एखाद्या समस्येवर तुम्ही मित्र परिवाराशी चर्चा कराल. व्यवसायात कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. नाही तर तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता अधिक आहे. व्यापार करणाऱ्यांच्या व्यापारात आज वाढ होईल. देवाच्या यात्रेसाठी गावाला जाण्याचा योग आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?