देशातील तब्बल ७ कोटी मुलांनी वयाची ५ वर्षे पूर्ण केल्यानंतरही आधारमध्ये(students)आवश्यक बायोमेट्रिक माहिती अद्याप अपडेट केलेली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित आधार क्रमांक निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून UIDAI युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया कडून विद्यार्थ्यांसाठी शाळांमधूनच आधार अपडेट करण्याची नवी सेवा लवकरच सुरू केली जाणार आहे.शाळाच बनेल आधार केंद्र, पालकांची संमती घेऊन होणार बायोमेट्रिक अपडेट UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४५ ते ६० दिवसांमध्ये ही मोहीम टप्प्याटप्प्याने देशभरात राबवली जाणार आहे.

– शाळेतच विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट केले जाणार
– यासाठी पालकांची संमती घेण्यात येणार
– मोफत सेवा फक्त ५ ते ७ वयोगटासाठी उपलब्ध
– त्यानंतर १०० रुपये शुल्क आकारले जाणार
UIDAI कडून जिल्ह्याला बायोमेट्रिक मशीन दिली जाणार असून, (students)ती फिरत्या स्वरूपात विविध शाळांमध्ये नेली जाणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना ही सेवा उपलब्ध होईल. यामुळे शाळा, शिष्यवृत्ती, सरकारी योजना, परीक्षा नोंदणी यांसाठी आधार सहजपणे वापरता येणार आहे.

वेळेत अपडेट न झाल्यास काय होईल? :
– जर बायोमेट्रिक अपडेट ७ व्या वर्षानंतर वेळेत न केल्यास:
– आधार क्रमांक निष्क्रिय होऊ शकतो
– सरकारी योजनांचा लाभ मिळवता येणार नाही
UIDAI यापुढे १५ वर्ष पूर्ण झाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील बायोमेट्रिक(students) अपडेटही शाळांमधूनच करण्याचा विचार करत आहे UIDAI च्या या उपक्रमामुळे पालकांना आधार केंद्रात रांगेत उभं राहावं लागणार नाही, आणि मुलांचे आधार वेळेवर अपडेट होतील. शाळांनी UIDAI सोबत समन्वय साधून लवकरच या मोहिमेत भाग घेण्यास सज्ज राहणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
नीता अंबानींची अनोखी साडी, तयार करण्यासाठी लागले तब्बल 10 महिने!
अंतराळातून परतल्यानंतर शुभांशू शुक्ला यांची काय अवस्था झाली पाहा; VIDEO व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात; चालत्या कारमधून फेकला गेला, व्हिडीओ व्हायरल