मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला असून, (accident) त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर बातमी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) धडाडीचे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप बापू धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात धोत्रे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (accident) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे आपल्या खाजगी वाहनाने मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना एक्सप्रेसवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या अपघातात दिलीप धोत्रे यांच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत असून, (accident) त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पंढरपूरमधील त्यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.दिलीप धोत्रे हे पंढरपूर भागातील मनसेचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याने राजकीय वर्तुळात या बातमीने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी