आजरा तालुक्यातील घरगुती वापराच्या चारचाकी गाड्यांना टोल माफ केला जाईल. तर व्यावसायिक वाहनांना पन्नास टक्के मासिक अथवा वार्षिक सवलतीचा पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. (commercial) यामुळे येथील टोल वसुलीबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील तहसीलदार कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व टोलमुक्ती संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची बैठक झाली. तहसीलदार समीर माने प्रमुख उपस्थित होते.

आजरा तालुक्यातील नागरिकांना टोल मोफत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. चारचाकी प्रायव्हेट MH 09 पासिंग असणाऱ्या वाहनांना व MH 09 (नसेल तर गावातील गाडी असल्याचा सरपंच दाखला) गाड्यांसाठी आधारकार्ड,फास्ट टॅग व आरसी बुक ची झेरॉक्स द्यावा लागणार आहे. (commercial) ऊस हंगाम कालावधीत ऊस वाहनांना टोल मोफत करण्याचा निर्णय झाला. संबंधित वाहनांची यादी कारखाना प्रशासनाने देणे आवश्यक.
पिवळी नंबर प्लेट असणारी व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलतीचा महिन्याचा पास देण्यात येणार आहे. पंचायत समिती पासून पाणी गटारीत न जाता रस्त्यावरुन वाहते, पथदिवे व पश्चिम भागातील प्रलंबित कामे आठवडाभरात पूर्ण करणार आहे. (commercial) याबाबत १५ दिवसांत पुन्हा बैठक घेऊन झालेल्या कामांची पूर्ततेचा आढावा घेवून टोल सुरु करु द्यायचा की नाही. हे ठरणार आहे. टोल नाक्यावरील अंतर्गत कामे करण्याची मुभा देण्यात आली. तहसिलदार समीर माने यांच्या प्रमुख बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीला संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व टोल मुक्ती संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी