संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत(share market) अखेर महायुतीने बाजी मारली. महाविकास आघाडीतील आमदारांच्या फाटाफूटीमुळे महायुतीचे सर्वच ९ उमेदवार विजयी झाले. परिणामी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने समर्थन दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, आमदारांची फाटाफूट आणि घोडेबाजारीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.
आम्हाला कोणताही पराभवाचा धक्का बसलेला नाही. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस(share market) पक्षाचे कोणतेही आमदार फुटलेले नाही. काँग्रेसचे ते ७ जण केवळ कागदावर काँग्रेससोबत होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फुटीर आमदारांना काल शेअर मार्केटसारखा भाव होता. काहींना २५ कोटी रुपये वाटले. तर काही आमदारांना प्रत्येकी २ एकर जमिनी देखील वाटल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“शिवसेनेकडे (ठाकरे गट) केवळ १५ मतं असतानाही आमचे उमेदवार मिलिंद नार्वेकर निवडून आले. शेकापचे जयंत पाटील सुद्धा निवडून आले असते, पण गणित जुळलं नाही. आम्ही सर्वांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण जयंत पाटलांकडे स्वतःच्या पक्षाचे मत नव्हते. शरद पवार यांनीही जयंत पाटलांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. ते आमच्या महाविकास आघाडीचा महत्वाचा भाग आहेत”, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात विनायक राऊत यांनी कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीवेळी पैशांचं वाटप झालं, काही लाख मते विकत घेण्यात आली, याबाबतचे सगळे पुरावे आमच्या हातात आहेत. म्हणूनच विनायक राऊत यांनी कोर्टात धाव घेतल्याचं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :
एमएस धोनीचं बाईक प्रेम! लाखोंच्या बाईक अन् कोट्यवधींच्या कार
विधान परिषदेची निवडणूक बळी गेला जयंत पाटलांचा
गणेशोत्सव गोड होणार! शिंदे सरकारकडून मिळणार ५६० कोटींचा आनंदाचा शिधा