सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये भांडणांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. माणसं कधीही कुठेही भांडण करायला सुरुवात करतात. कधी मेट्रो, तर कधी बस, कधी भर रस्त्यात भांडणे पाहायला मिळतात. सध्या मुबंई लोकलमधील महिलांच्या(Women) भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुबंई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे तर असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असती.

मुंबई लोकल लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. दररोज मुंबईतील हजारो प्रवासी लोकलने कामावर जातात. सकाळी सकाळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यामध्ये महिलांच्या डब्यात तर श्वास घ्यायलाही जागा नसते. सध्या या मुंबईल लोकलमधीलच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिलांमध्ये जबर हाणामारी झाली आहे. या महिलांनी(Women) एकमेकांनी अक्षरश: रक्तबंबाळ केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रेलिंगला टेकून उभी आहे. ही महिला तिच्या समोर उभी असलेल्या महिलेला थोबाडात सपासप मारताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, त्या महिलेच्या डोक्यातून रक्त येताना दिसत आहे. तिचे केस अस्तायव्यस्त झालेले दिसत आहे. ती देखील दुसऱ्या महिलेला मारण्याचा प्रयत्न करत आहे.
याच वेळी काही महिला दोघींची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दोघीही ऐकायला तयार नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मी़डियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना १९ जून रोजी घडली. चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या महिलांच्या लोकलमध्ये घडली आहे. परंतु अद्याप यावर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही असे सांगण्यात येत आहे.
Mumbai Local Fight: केस ओढले, चापटा मारल्या, धक्काबुक्की; लोकलमध्ये महिलांमध्ये रक्तबंबाळ होईपर्यंत तुफान हाणामारी, Video Viral#mumbailocal #mumbailocalfight #localmumbai #ladiesfight pic.twitter.com/SSOxYSukcR
— Deshdoot (@deshdoot) June 20, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @deshdoot या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने अलीकडे या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे, तर दुसऱ्या एका युजरने जागेवरुन किंवा थोडा धक्का लागला त्यावरुन भांडणे झाली असलतील असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
प्रियांका चोप्राचा अपघात, चेहऱ्यावर झाली गंभीर दुखापत
पांडुरंगाच्या मर्जीने राजकारणात उलथापालथ होणार अन् अजितदादा मुख्यमंत्री…
जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत संजय कपूर, करिश्माच्या Ex नवऱ्याचा अखेरचा VIDEO समोर!