केरळच्या मलप्पुरम शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ(video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्यांनी सर्वच हादरून गेले असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात एका महिलेला भरधाव कारने धडक दिल्याचे दिसून आले.

मात्र ही काय साधी सुधी धडक नसून या धडकेत महिला अक्षरशः हवेत झेपावत जोरदार जमिनीवर येऊन कोसळली. महिलेसोबतचा हा अपघात इतका भीषण होता की यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले. यातही आणखीन धक्कादायक बाब म्हणजे यावेळी महिलेसोबत तिचा चिमुकलाही चालत होता ज्याने संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिले.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये(video) एका वेगाने येणाऱ्या पांढऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला भरवेगात धडक दिल्याचे दिसून आले. या भीषण धडकेत, महिला काही फूट अंतरावर पडली तर तिच्यासोबत चालत असलेले मूल थोडक्यात बचावले. फुटेजमध्ये, टक्कर झाल्यानंतर लगेचच, मूल त्याच्या बेशुद्ध आईकडे धावत असल्याचे आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. त्याची ही अवस्था पाहून सर्वांचेच हृदय हेलावून गेले.
मल्लापुरम में महिला को कार ने टक्कर मार दी, जिससे वह गिर गई, माँ की ऐसी हालत देख बच्चा अचेत हो गया, उसने दौड़कर उसे जगाने की कोशिश की !! #Shockingnews #TrendingNews #ViralVideo #CCTVliveviralVideo pic.twitter.com/kIZ0jwSOKe
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) May 1, 2025
थरार अपघाताचा हा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. महिलेच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याची पूर्ण चौकशी व्हायला हवी, मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकतो का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी त्या महिलेसाठी प्रार्थना करतो”.
हेही वाचा :
रात्री ब्रा घालून झोपल्यास ब्रेस्ट कॅन्सर होतो?
पृथ्वी शॉच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री, अभिनेत्रीचा वाढदिवसही साजरा केला, Video
प्रसिद्ध गायिकेचा आगीत होरपळून मृत्यू; नव्वदच्या दशकात गाजलं होतं नाव