अरे हे आयपीएल आहे की गल्ली क्रिकेट! ‘या’ कारणामुळे MI VS RR सामना बराचवेळ थांबला

1 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात यांच्यात आयपीएल 2025 चा 50 वा सामना(match) पार पडला. या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 100 धावांनी पराभूत करून सलग 6 वा सामना जिंकला.

मात्र या सामन्यादरम्यानचा(match) एक अशी घटना घडली ज्यामुळे सामना बराचवेळ थांबला होता. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना हा आयपीएलचा सामना आहे की गल्ली क्रिकेटचा असा प्रश्न अनेकांना पडला.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सुरु असताना ध्रुव जुरेलने एक असा शॉट मारला ज्यामुळे बॉलचं हरवला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू मैदानात बॉल शोधताना दिसले. राजस्थानच्या 9 व्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली. ही ओव्हर मुंबईकडून कर्ण शर्माने टाकली. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ध्रुव जुरेलने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून इनसाइड-आउट शॉट खेळला आणि तो सरळ सिक्ससाठी मैदानाबाहेर गेला.

ध्रुव जुरेलच्या या शॉटनंतर बॉल बाउंड्री रोप जवळील जाहिरातीच्या स्क्रीनच्या पलीकडे गेला. परंतु बॉल अचानकपणे हरवला, त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या तीन खेळाडूंनी मिळून बॉल शोधण्याचा प्रयत्न केला पण खूप प्रयत्न केल्यावर सुद्धा त्यांना बॉल सापडला नाही. यामुळे खूप वेळ हा सामना थांबवण्यात आला होता.

या घटनेनंतर अंपायर्सने नवीन बॉल निवडला आणि मग सर्व खेळाडू त्यांच्या फिल्डिंग पोझिशनवर येऊन सामना पुन्हा सुरु झाला. आयपीएलमध्ये यापूर्वी अशी घटना खूप कमी वेळा घडली होती. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात(match) राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. मुंबई इंडियन्सने फलंदाजी करताना रायन रिकेल्टनने 61, रोहित शर्माने 53 तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी नाबाद 48 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सने 2 विकेट गमावून 217 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 218 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पूर्ण करण्यात राजस्थान रॉयल्स अपयशी ठरली. 16.1 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने त्यांना 117 धावांवर ऑल आउट केले.

हेही वाचा :

रात्री ब्रा घालून झोपल्यास ब्रेस्ट कॅन्सर होतो?

प्रसिद्ध गायिकेचा आगीत होरपळून मृत्यू; नव्वदच्या दशकात गाजलं होतं नाव

आईला भरधाव कारने उडवताच मुलगा हंबरडा फोडून रडू लागला Video Viral