तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर रोमँटिक(romance) चित्रपट ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा ट्रेलर आज (25 जुलै) रिलीज झाला आहे. प्रेम, विश्वासघात आणि खुनाच्या रहस्याने हा चित्रपट भरलेला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा एका खून प्रकरणात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट 9 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर(romance) प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 2021 मध्ये आलेल्या ‘हसीना दिलरुबा’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. यावेळी विक्की कौशलचा भाऊ सनी कौशल या चित्रपटात सहभागी झाला आहे.
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये तापसी ‘राणी’च्या पात्रात दिसत आहे. चित्रपटात तिची व्यावसायिकता अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे. राणीचा नवरा ‘ऋषू’ म्हणजेच विक्रांत मॅसीची व्यक्तिरेखाही खूपच सुंदर आहे. ट्रेलरमध्ये त्याच्या आणि राणीच्या लग्नाची दृश्येही दाखवण्यात आली आहेत.
ऋषू आपल्या पत्नीला सांगतो की, त्याच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होऊ नये. मात्र, ट्रेलरमध्ये पुढच्याच सीनमध्ये ‘अभिमन्यू’ म्हणजेच सनी कौशल राणीच्या आयुष्यात येतो. जो राणीच्या आयुष्यात पूर्णपणे बुडून जातो.
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट नीलच्या गूढ हत्येवर आधारित आहे. नीलचा खून कोणी केला हे शेवटी कळेल. राणीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी हे कृत्य केलं का? की राणीच्या भोवतालच्या लोकांपैकी तिचा नवरा ऋषू सक्सेना याने हे केलं आहे. हे सर्व रहस्य 9 ऑगस्ट रोजी उघड होणार आहेत.
तापसी पन्नू लवकरच अक्षय कुमारसोबत ‘खेल खेल में’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तिचा प्रतिक गांधीसोबतचा ‘वो लडकी है कहाँ’ चित्रपट देखील सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा :
टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावर पंचगंगेचे पाणी आल्याने वाहतूक बंद
राज्यात पुढील चार दिवस दमदार पाऊस! कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट
‘..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,’ भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं