दादर स्टेशनबाहेर संतापजनक प्रकार इडलीसाठी वापरले शौचालयातील पाणी पाहा VIDEO

ऑफिसला जाण्याच्या गडबडीत तुम्ही घरात नाश्ता करायला विसरता अन् ऑफिसनजीक असलेल्या एखाद्या स्टॉलवर सकाळची पोटपूजा करता. दादर रेल्वे स्थानक परिसरात असे अनेक स्टॉल्स आहेत जिथे असंख्य कर्मचारी सकाळची न्याहरी उरकतात. पण सध्या व्हायरल होणारा एक व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर पुन्हा कधीच रस्त्यावरील पदार्थ खाणार नाहीत. नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात एक इडली विक्रेता चक्क शौचालयातील पाण्याचा वापर करताना दिसतोय.

मुंबईतील दादर स्थानक परिसरातील खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सचे असंख्य व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. स्वस्तात मस्त कुठे खाण्यास मिळेल, (Toilet water) यासाठी अनेकजण शोधमोहिमही करत असतात. सकाळची न्याहरी असो वा संध्याकाळचा स्नॅक्स असो, मुंबईकर सतत स्ट्रीट फूड खाण्याच्या विचारात असतो. कारण मुंबईतील बरेच प्रसिद्ध स्ट्रीट फुड्स स्टॉल्स असून अनेक ठिकाणी उत्तम पदार्थ मिळतात. पण अशाच स्ट्रीट फुडसाठी कोणी शौचालयातील पाण्याचा वापर करत असेल तर? साहजिक यामुळे मुंबईकरांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दादर रेल्वे स्थानक परिसरातील फुटपाथ दिसत आहे. या फुटपाथवर अनेक स्टॉल्स असून एक इडली विक्रेता शौचालयाजवळ ठेवलेल्या पांढऱ्या रंगाचा कॅन घेऊन त्याच्या स्टॉलजवळ असलेल्या निळ्या रंगाच्या पिंपात ओतताना दिसत आहे.(Toilet water) त्याच्या या कृत्यामुळे आता अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओवर आता असंख्य कमेंट्स येत असून मुंबईसाठी ही नित्याचीच बाब असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे, तर अनेकांनी या इडली विक्रेत्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. तर, एका युजरने म्हटलंय की “दादर स्थानक परिसरात इडली काय, कोणताही पदार्थ खाऊ नये. तिथे चहा, लिंबू पाण्यासाठी वापरलेले पाणीही शौचालयातीलच असतं.” तर एकाने उपहासाने म्हटलंय की शौचालयातील पाणीही पालिकेकडूनच येतं ना? त्यावर अनेकांनी रिप्लाय केले असून शौचालयात प्रत्येक ठिकाणी विषाणू असतात, हेच विषाणू नळावाटे पाण्यात जाण्याची शक्यता असते. (Toilet water) दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आहे, याची तारीख निश्चित होऊ शकलेली नाही. यावर मुंबई महापालिकेने काही कारवाई केली आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा

जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात

ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?