कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
मुंबईच्या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आणि तत्सम सेलिब्रिटीजना तुम्ही आमच्यापासून सुरक्षित नाही. असा भीती उत्पन्न करणारा साप त्यांच्या पायात सोडण्याचा प्रयत्न म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील प्राण घातक हल्ल्याच्या प्रकाराकडे पाहावे लागेल. जे कोणी अनिल पंडित किंवा लॉरेन्स बिश्नोई यामागे असतील ते या प्रयत्नात यशस्वी झाले आहेत. ज्या तिघा तरुणांना अवघ्या पंधरा तासात जेरबंद करण्यात आले आहे ती प्यादी आहेत. (celebrities) त्यांच्यापासून वजिरापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.

बिश्नोई टोळीच्या हिट लिस्टवर अभिनेता सलमान खान आला तो त्याने हम साथ साथ है या चित्रपटाच्या राजस्थानमधील शूटिंग दरम्यान केलेल्या काळवीटाच्या शिकारीमुळे. त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. तो राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दारात बिश्नोई टोळीने फायरिंग केले होते. त्यानंतर त्याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची भर दिवसा हत्या झाली. (celebrities) त्यानंतर ही रोहित शेट्टी, कपिल शर्मा यांना मारण्याचे किंवा त्यांच्या घरासमोर फायरिंग करण्याचे प्रकार घडले आणि आता टायगर श्रॉफ वर हा हल्ला झाला आहे. काही गुन्ह्यात बिश्नोई टोळीच्या गुंडांना अटक करण्यात आली असून ते सर्वजण तुरुंगात आहेत. पण तपास यंत्रणा या गुंडांच्या आका पर्यंत अध्यापक पोहोचलेल्या नाहीत. खरे सूत्रधार परदेशात आहेत. टायगर वरील हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई टोळीच्या अनिल पंडित ने घेतली आहे आणि तो अमेरिकेत कुठेतरी लपून बसला आहे. या बिश्नोई टोळीचा स्लीपर सेल मुंबई हरियाणा सह काही प्रमुख शहरांमध्ये सक्रिय आहे. त्यांचा वापर करून हे हल्ले घडवले जात आहेत. सूत्रधार आणि भाडोत्री गुंड यांच्यामध्ये कुणीतरी मध्यस्थ म्हणून त्रयस्थ व्यक्ती आहे. ही त्रयस्थ यंत्रणा किंवा स्लीपर्स सेल चे नेटवर्क उध्वस्त केल्याशिवाय या टोळीची दहशत संपणार नाही.
1980 ते 1990 या दशकात मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर टोळी युद्ध सुरू होते. या टोळी युद्धात जी मोडस वापरली जात होती तीच मोडस अर्थात गुन्हे पद्धती सध्या बिश्नोई टोळीकडून वापरली जात आहे. सूत्रधार आणि प्रत्यक्ष गुन्हेगार यांचा थेट संबंध आलेला नसतो. आणि म्हणूनच सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना मोठी अडचण येते. हाच अनुभव बिश्नोई टोळीच्या माध्यमातून सध्या येतो आहे. मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. गुन्हेगारांसाठी ती सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. आणि म्हणूनच या शहरावर आपली दहशत प्रस्थापित करून अमाप पैसा कमावण्याचा बिश्नोई टोळी किंवा अनिल पंडित यांचा हेतू आहे. या टोळीने अशा पद्धतीने अमाप पैसा मिळवलेला असावा. कारण या टोळी विरुद्ध तक्रार करण्याचे धाडस संबंधितांच्याकडून होऊ शकत नाही.
मुंबई पोलिसांच्या माहितीवरून राजस्थान पोलिसांनी टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्या तिघांना रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. न्यायालयातून प्रवासी कस्टडी घेऊन येणाऱ्या मुंबई पोलिसांना त्यांचा कुणीतरी पाठलाग करत आहे असा संशय आला. आणि मग मोठ्या बंदोबस्तात त्यांना मुंबईत घेऊन यावे लागले. याचा अर्थ संशयित तीन आरोपींच्या आसपास कुणाच्यातरी हालचाली सुरू होत्या असा होतो.पोलिसांनी पाच पेक्षा अधिक संशयतांना या प्रकरणात अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या सर्व संशयितांचा सूत्रधाराचे कठपुतली सारखा वापर केला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्याची उकल केली जाईल. पण त्यांना हा गुन्हा करण्यास कोणी प्रवृत्त केले? त्यांना कोणते आमिष दाखवण्यात आले होते? हत्यारे कुणी पुरवली? या सर्व प्रश्नांची उत्तरेही तपास यंत्रणेला मिळतील. पण मुळापर्यंत जाता येईलच असे नाही.
लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात अति सुरक्षा विभागात बंदिस्त आहे. त्याला कोणत्याही इतर गुन्ह्यात संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले जात नाही. त्याच्या विरुद्धची न्यायालयीन प्रक्रिया व्हिसीच्या माध्यमातून पार पाडली जाते. तथापि मुंबई पोलिसांना खास परवानगी घेऊन साबरमती कारागृहात जाऊन लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करता येऊ शकते. (celebrities) त्याच्या माध्यमातून अनिल पंडित चे धागेदोरे सापडू शकतात. पण असे काही यापूर्वी घडलेले नाही आणि म्हणूनच ते टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी घडेल असे वाटत नाही. काही दिवसानंतर सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित न्यायालयीन कोठडीत जातील. त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल केले जाईल. आणि दरम्यान आणखी कोणाच्या घरासमोर फायरिंग होईल. टायगर वरील हल्ल्यामुळे इतर अभिनेते घाबरले आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी बुलेटप्रूफ ग्लास बसवण्याचे काम सुरू केले आहे. अभिनेते आणि तत्सम सेलिब्रिटीज यांच्या मनात भयगंड निर्माण करण्यात बिश्नोई टोळी यशस्वी झाली आहे असे नक्की म्हणता येईल. जोपर्यंत सूत्रधाराच्या मुस्क्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत अधून मधून असेच प्रकार घडतील यात संदेह नाही.
हेही वाचा :
अखेर पाऊस आला, राज्यात ऑक्टोबरच्या या तारखेला कोसळधारा, IMD चा महत्त्वाचा अंदाज आला