मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील(assembly) यांनी 20 जुलै रोजी सुरू केलेले आपले उपोषण स्थगित केलं आहे. या निर्णयानंतर त्यांनी आपल्या आगामी रणनीतीची आखणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आता सुरू होणार असून, 7 ऑगस्टपासून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार आहे.
जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत(assembly) जाहीर केलं की, राज्यभर दौरा केल्यानंतर 29 ऑगस्टला ते महत्त्वपूर्ण घोषणा करतील. “आमदारांना पाडायचं की तिसऱ्या आघाडीत जायचं, की आणखी काही वेगळा निर्णय घ्यायचा, याबाबत निर्णय घेऊ,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही चिंता निर्माण झाली आहे. जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळे राजकीय गणितात मोठा बदल होऊ शकतो.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जरांगे पाटील यांनी आधीच दलित, मुस्लीम, आणि धनगर समाजाला आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी एमआयएमचे ओवेसी, शेतकरी नेते बच्चु कडू, आणि प्रकाश आंबेडकर यांना आवाहन केलं आहे. जरांगे पाटील यांच्या या हालचालीमुळे महायुतीला फायदा होईल, असं बोललं जात आहे.
पारंपरिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार जर जरांगे पाटील यांच्या बाजूला गेले, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची युती झाल्यामुळे भाजप शिवसेनेला फायदा झाला होता. जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकीत कोणत्या भूमिका घेतल्या जातील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांच्या आगामी दौऱ्यामुळे आणि 29 ऑगस्टला होणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपचं कारण समोर, सोहैल खानकडून मोठा खुलासा
‘आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी…’, 300 कोटींचा उल्लेख करत आरोप
ब्रेकिंग! अजित पवारांसह ४१ आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस