बाजारात आले Xiaomi चे नवे AI स्मार्ट ग्लासेस, AI असिस्टेंटसह मिळणार 12MP कॅमेरा!

Xiaomi AI Glasses चीनमध्ये एका ईव्हेंटमध्ये लाँच(Launch) करण्यात आले आहे. चीनी टेक्नोलॉजी कंपनी Xiaomi ने लाँच केलेले हे नवे डिव्हाईस कंपनीच्या Vela OS वर आधारित आहे. यामध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. शिवाय या डिव्हाईसची बॅटरी लाईफ देखील अत्यंत कमालीची आहे. या डिव्हाईसची किंमत किती आहेत, त्याचे फीचर्स जाणून घेऊया.

Xiaomi AI Glasses च्या स्टँडर्ड मॉडेलची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 23,900 रुपये आहे. तर सिंगल-कलर इलेक्ट्रोक्रोमिक मॉडेलची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 32,200 रुपये आहे. तर सर्वात महागडे मल्टीकलर इलेक्ट्रोक्रोमिक एडिशन CNY 2,999 म्हणजेच सुमारे 35,800 रुपयांना लाँच(Launch) करण्यात आले आहेत. नवीन Xiaomi AI Glasses चीनमध्ये ब्लॅक, ब्राउन आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये कंपनीची वेबसाइट आणि दुसऱ्या रिटेल चॅनेल्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

युजर्स Xiaomi AI Glasses अँड्रॉइड 10 आणि iOS 15 किंवा नवीन मॉडेल्सवर चालणाऱ्या स्मार्टफोन्ससोबत जोडू शकतात. परंतु त्याच्या सर्व वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी Xiaomi च्या HyperOS स्किनवर चालणाऱ्या फोनसोबत जोडणे आवश्यक आहे. मात्र या डिव्हाईसचे सर्व फीचर्स अ‍ॅक्सेस करण्यासाठी Xiaomi ने HyperOS स्किनवाल्या फोनसोबत जोडणं आवश्यक आहे. स्मार्ट ग्लासेसमध्ये D-शेप्ड TR90 नायलॉन फ्रेम आणि टाइटेनियम हिंजेस देण्यात आले आहेत. Xiaomi चं असं म्हणणं आहे की, या हिंजेसची 18,000 यूज साइकिल्ससाठी चाचणी करण्यात आली आहे.

Xiaomi AI Glasses Snapdragon AR1+ चिपवर आधारित आहेत. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह जोडण्यात आले आहेत. हे डिव्हाईस 12-मेगापिक्सेल Sony IMX681 सेंसर कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. जो 4,032×3,024 पिक्सेल्स फोटोज आणि 2K/30fps वीडियोज कॅप्चर करतो. यामध्ये ऑडियो कॅप्चर करण्यासाठी पाच माइक्रोफोन्स आणि बोन कंडक्शन देखील देण्यात आले आहेत.

Xiaomi AI Glasses च्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.4 यांचा समावेश आहे. स्मार्ट ग्लासेस Xiao AI असिस्टेंटला सपोर्ट करतो, जो 10 हून अधिक लँग्वेजमध्ये रियल-टाइम ट्रांसलेशन, ऑब्जेक्ट रिकग्निशन आणि बिल्ट-इन कॅमेऱ्याद्वारे फूड मॅक्रो आणि कॅलरीज ओळखण्याची सुविधा देते. यूजर्स Xiaomi Glasses अ‍ॅपद्वारे मीटिंग सारांश देखील पाहू शकतात.

शाओमीने त्यांच्या नवीन स्मार्ट ग्लासेसमध्ये 263mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी दिली आहे, जी सक्रिय वापरात 8.6 तास आणि स्टँडबाय मोडमध्ये 21 तास बॅटरी लाइफ देण्याचा दावा करते. ते यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे 45 मिनिटांत चार्ज केले जाऊ शकतात. धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी त्यांना IP54 रेटिंग आहे.

हेही वाचा :

सिंधू पाणी करार : पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका!

राज-उद्धव एकत्र… शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा! 

बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! रुग्णालयाबाहेरील Video समोर