भररस्त्यात कॉंग्रेसच्या नेत्यांवर धारदार शस्त्राने सपासप वार…

यवतमाळ : राज्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये नवीन घडामोडी घडत आहे. आता कॉंग्रेसला(current political news) मोठा धक्का बसला आहे. यवतमाळमध्ये कॉंग्रेस नेत्यावर हल्ला करण्यात आला आहे. धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यतवमाळचे कॉंग्रेस तालुकाध्यक्षांवर हा हल्ला करण्यात आला आहे. यवतमाळच्या दत्त चौकामध्ये चारजणांनी मिळून कॉंग्रेस नेत्यावर हा जीवघेणा हल्ला केला आहे.

कॉंग्रेसचे(current political news) नेते व यवतमाळ तालुकाध्यक्ष रमेश भिसनकर यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. चार हल्लेखोरांनी हा भररस्त्यामध्ये त्यांच्यावर हल्ला केला. रमेश भिसनकर हे रामायण हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. हे वार पोटावर, खांद्यावर आणि छातीवर केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

रस्त्यावर हल्ला झाल्यानंतर उपस्थित लोकांनी कोणाताही प्रतिकार न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली. काल गुरुवारी (दि.27) रमेश भिसनकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी दत्त चौकामध्ये असलेल्या एका रिक्षाचालकाने कॉंग्रेस नेत्यांना मदतीचा हात पुढे केला. मात्र तोपर्यंत कॉंग्रेस नेते रमेश भिसनकर हे गंभीर जखमी झाले होते.

रमेश भिसनकर यांच्यामध्ये आणि हल्लेखोरांमध्ये झटापट झाली. यामध्ये भिसनकर यांनी चाकू हिसकावून घेऊन हल्लेखोरांना मागे केले. या संधीचा फायदा घेत रिक्षाचालकाने कॉंग्रेस नेत्याला मदत करत त्यांना पटकन रिक्षामध्ये बसवले. यावेळी भिसनकर हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये होते. रिक्षाचालकाने थेट रुग्णालयामध्ये नेले. त्यानंतर भिसनकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

कॉंग्रेसचे यवतमाळ तालुकाध्यक्ष रमेश भिसनकर यांच्यावरील हल्ला राजकीय असल्याचे सांगितले जात आहे. रमेश भिसनकर हे राजकारणामध्ये सक्रीय आहे. राजकीय वर्तुळातील पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

यवतमाळ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत असून पोलिसांनी हल्लेखोरांना अटक देखील केली आहे. या प्रकरणातील आरोपी वामन राठोड (रा.बेचखेचा) आणि देवेंद्र आडे (रा.भांबराजा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या धारदार शस्त्राच्या हल्लाचा मूळ सूत्रधार शोधण्याचा प्रयत्न यवतमाळ पोलीस करत आहेत.

हेही वाचा:

“धर्मवीर 3′ ची पटकथा मी लिहिणार…”; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा

इचलकरंजीत सलग ५ दिवस धरणे आंदोलन, कार्यकर्त्यांचे मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन

महाराष्ट्र हादरला! मामीनं केला घात? बर्थडे पार्टीत दारू पाजून दहावीच्या मुलीवर दोघांचा अत्याचार