भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथे दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात(stadium) टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चालू सामन्यादरम्यान दरम्यान एक मोठी घटना घडली असून यात बांगलादेश क्रिकेट टीमचा सुपर फॅन टायगर रॉबी याला काही लोकांकडून मारहाण करण्यात आली आहे. टायगर रॉबी हा बांगलादेश टीमचा मोठा चाहता असून तो जगभरात होणाऱ्या सामन्यांमध्ये त्याच्या टीमला सपोर्ट करताना दिसतो.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर(stadium) भारत बांगलादेश यांच्यात दुसऱ्या टेस्ट सामन्याला 27 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून तब्बल 280 धावांनी विजय मिळवला होता. मात्र कानपूर येथील टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी निंदनीय घटना घडली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशचा सुपर फॅन टायगर रॉबी याला काही लोकांनी मारहाण केली.
टायगर रॉबी याने बांगलादेशला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण शरीर हे वाघाप्रमाणे रंगवले होते तसेच त्यावर बांगलादेशचा झेंडा सुद्धा काढला होता. मात्र सामना सुरु असताना काही लोकांनी रॉबीला मारहाण केली. कानपुर पोलिसांनी टायगर रॉबी याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सध्या पावसामुळे कानपूरमधील कसोटी सामना थांबवण्यात आला आहे. या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 35 षटकात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. मुशफिकुर रहीम (6 धावा) आणि मोमिनुल हक (40 धावा) क्रीजवर आहेत. आतापर्यंत वेगवान गोलंदाज आकाशदीपने टीम इंडियासाठी सर्वाधिक 2 विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विनला एक विकेट मिळाली.
भारतीय प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग-11 : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.
हेही वाचा:
भररस्त्यात कॉंग्रेसच्या नेत्यांवर धारदार शस्त्राने सपासप वार…
“धर्मवीर 3′ ची पटकथा मी लिहिणार…”; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा
इचलकरंजीत सलग ५ दिवस धरणे आंदोलन, कृती समितीचे मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन