दुसऱ्या सामन्याआधी यू-टर्न! संघाला सोडून गेलेला जोफ्रा आर्चर पुन्हा परतला; इंग्लंडच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होणार?

बर्मिंगहॅममध्ये एजबॅस्टन स्टेडियमवर उद्या २ जुलै रोजी भारत विरुद्ध(apple tv shows) इंग्लंड मालिकेतील दुसरा सामना सुरु होणार आहे. काल ३० जून रोजी इंग्लंडने या सामन्यातील ११ शिलेदारांची घोषणा केली. प्लेईंग ११ मध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा समावेश नसल्याने चर्चा सुरु झाल्या. या सामन्यामधून आर्चर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता.

जोफ्रा आर्चर काही कौटुंबिक कारणांमुळे इंग्लंडचा संघ सोडून गेला होता. सराव सत्रादरम्यानही जोफ्रा आर्चर दिसला नव्हता. त्यानंतर काल इंग्लंडच्या संघाने प्लेईंग ११ ची घोषणा केली. (apple tv shows)लीड्स कसोटीमध्ये जे ११ खेळाडू सहभागी झाले होते, त्याच खेळाडूंना एजबॅस्टन कसोटीमध्ये खेळण्याची संधी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. कौटुंबिक अडचणींमुळे जोफ्रा आर्चर सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आता एजबॅस्टन कसोटीपूर्वी जोफ्रा आर्चर बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड संघात पुन्हा सामील झाला असल्याची माहिती समोर आले आहे. रेव्हस्पोर्ट्झने दिलेल्या माहितीनुसार,(apple tv shows) जोफ्रा सोमवारी (३० जून) इंग्लंडच्या संघाला सोडून गेला होता. आता तो आज मंगळवारी (१ जुलै) बर्मिंगहॅममध्ये परतला आहे. परतल्यानंतर आर्चरने नेटमध्ये सराव देखील केला. जोफ्रा आर्चर परतल्याने इंग्लंडच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जोफ्रा आर्चर सुमारे चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत होता. दुखापतीमुळे तो बराच काळ इंग्लंडच्या कसोटी संघाबाहेर होता. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला होता. आता पुन्हा एकदा भारताविरुद्ध कसोटी फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळणार होती. आता सामन्यात खेळून आर्चर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..