विराट कोहलीकडून ज्यूनियर खेळाडूचा अपमान? ‘हा तर…’ VIDEO व्हायरल!

आरसीबीचा स्टार खेळाडू आणि क्रिकेट जगतातील दिग्गज म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली (Virat Kohli)सध्या एका वादात अडकला आहे. आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 1 सामन्यात त्याने पंजाब किंग्सच्या युवा खेळाडू मुशीर खानविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. ‘हा पाणी आणणारा आहे’ असा टोमणा त्याने मैदानावर मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

काल झालेल्या पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात ही घटना घडली. पंजाबची फलंदाजी सुरु असताना नवव्या षटकात मुशीर खान फलंदाजीसाठी मैदानात उतरला. आयपीएलमध्ये त्याचा हा पहिलाच सामना होता आणि तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळत होता. त्याचवेळी विराट कोहलीने त्याच्याकडे पाहत ‘हा पाणी घेऊन येणारा आहे’ असे वक्तव्य केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.

मुशीर खानने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, विराट कोहलीने(Virat Kohli) त्याला खास बॅट भेट दिला होता. तो विराटला आदराने ‘भैय्या’ म्हणतो. मात्र या सामन्यात विराटनेच त्याच्याबद्दल अपमानास्पद वाक्य वापरल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप उसळला आहे. अनेकजण म्हणत आहेत की, विराटसारख्या दिग्गज खेळाडूकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती.

या प्रकारानंतर ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर विराट कोहलीच्या वागणुकीवर टीकास्त्र सुरू झाली आहे. ‘किंग कोहली’ म्हणवून घेणाऱ्या खेळाडूकडून हे शोभेसं ठरत नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.

ज्यूनियर खेळाडूंसोबत आदराने वागणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. मात्र विराटच्या या कृतीने त्याचा छोटेपणा उघड केला आहे, असे मत अनेकांनी मांडले आहे.

हेही वाचा :

सावधान! महाराष्ट्रात ‘या’ 11 जिल्ह्यांना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका

धक्कादायक! अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी निघाल्या लाडक्या बहिणी

सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, चांदीच्या किंमतही नरमल्या!