सध्या सोशल मीडियावर एक गोड व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.(little) ‘एक नंबर, तुझी कंबर’ या लोकप्रिय गाण्यावर एका चिमुकलीने केलेला डान्स पाहून नेटकर्यांची मनं जिंकली आहेत. तिचे सहज आणि निरागस हावभाव, गोड हसू आणि आत्मविश्वासाने भरलेली स्टेप्स पाहून अनेकांचे चेहरे खुलले आहेत.

एक नंबर तुझी कंबर हे मराठमोळं गाणं मागील काही काळात खूपच लोकप्रिय झालं आहे.(little) त्याच्या शब्दांत मजा, संगीतात जोश आणि लयीत नाचण्याची प्रेरणा आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर रील्स (Reels) बनवत आहेत. या गाण्याच्या पार्श्वभूमीवर चिमुकलीचा डान्स हा केवळ मनोरंजन नाही तर तिचा आत्मविश्वास, कलेप्रती ओढ आणि भोळेपणाचं दर्शनही घडवतो.
इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह यूट्यूबवर हा व्हिडिओ धूमाकूळ घालत आहे.(little) या व्हिडिओमध्ये साधारण ५-६ वर्षांची एक चिमुरडी ‘एक नंबर, तुझी कंबर’ या जोशपूर्ण गाण्यावर डान्स करताना दिसते. तिचे हावभाव, चेहर्यावरचे एक्स्प्रेशन्स आणि लयबद्ध ठुमके थेट मनात घर करतात.
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..