नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँकेने आपल्या 129 निवृत्त (bank)कर्मचाऱ्यांची पेन्शन 1 जुलैपासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक निवृत्त आणि वयोवृद्ध कर्मचाऱ्यांपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. बँकेकडून जून महिन्यात संबंधित 129 पेन्शनधारकांना पत्र पाठवून 1 जुलै 2025 नंतर पेन्शन मिळणार नसल्याचे कळवले गेले. यामागील मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेले लेखापरीक्षण आणि त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटी. संचालक मंडळाने समस्या सोडवण्याऐवजी थेट पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, हे अनेकांना धक्कादायक वाटत आहे.

RBIच्या निरीक्षणानुसार, पेन्शनसाठी आवश्यक निधीची तरतूद योग्य पद्धतीने केली गेलेली नाही. त्यामुळे बँकेने 13 मे आणि 1 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेनंतर 1 जुलैपासून पेन्शन थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या भविष्यासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.(bank)नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँक ही मूळतः 1934 साली नोंदणीकृत पतसंस्था होती, आणि नंतर 1995 साली तिचं रूपांतर सहकारी बँकेत करण्यात आलं. बँकेच्या महाल, नंदनवन, पाचपावली आणि सिव्हिल लाईन या चार शाखा असून, यामध्ये कार्यरत सर्वच कर्मचारी महानगरपालिकेच्या सेवेत आहेत.
बँकेच्या पेन्शनवर अवलंबून असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या कर्मचाऱ्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बँकेच्या सेवेत घालवलं असून, (bank)निवृत्तीनंतरचा मुख्य आधारच हिरावून घेतल्याने नाराजी वाढली आहे.31 मार्च 2021 पर्यंत बँकेचं भागभांडवल 1240.82 लाख रुपये इतकं नोंदवले गेले आहे. तरीही पेन्शनसाठी निधीची योग्य तरतूद का झाली नाही, यावर बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की, बँकेच्या अंतर्गत व्यवस्थापनात नेमकी चूक कुठे झाली?
हेही वाचा :
शेतकऱ्यांना भकास करून, शक्ती पीठ रस्त्यांचा विकास नको
महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…