गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी रात्री(man city tickets) पुणे शहरात जोरदार हजेरी लावली. शहरासह परिसरातील घाटमाथ्यांवरही दमदार पावसाची नोंद झाली. आगामी काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.

राज्यात यंदा पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचे चित्र(man city tickets) गेल्या काही दिवसांत दिसून येत होते. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. विशेषतः पुणे, कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी रात्री पुणे शहरात जोरदार हजेरी लावली. शहरासह परिसरातील घाटमाथ्यांवरही दमदार पावसाची नोंद झाली.(man city tickets) यामुळे खडकवासला धरणातून रात्री 12 वाजल्यापासून 6451 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ-घट होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांतही पावसाचा जोर ३ ते ६ जुलै दरम्यान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घाटमाथ्यावर पाऊस वाढणार
पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी या भागातील नद्यांमध्ये पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आदेश दिले गेले आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा संपणार?
राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून या भागांमध्येही पावसाची क्रिया सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
पुणेकरांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन
धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्यात गढूळपणा वाढला आहे. पाण्यासोबत माती आणि गाळ धरणात पोहोचत असल्याने पुणेकरांकडून नळांना येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता खराब असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेने पाणी शुद्ध करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनीही काळजी घेत पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!
‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे
‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ