पुणे, पिंपरी, चिंचवड नाशिक, छत्रपती संभाजी नगर,ठाणे,नवी(transform)मुंबई,सोलापूर या महानगराच्या तुलनेतकोल्हापूर शहर हे किती तरीवर्षे मागे आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार इथले लोकप्रतिनिधी आहेत. आता महापालिका निवडणुका तोंडावर आले आहेत आणि त्या जिंकण्यासाठी आश्वासने दिली जाऊ लागली आहेत. कोल्हापूर महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या, आम्ही कोल्हापूर शहराचा कायापालट करू असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले आहे मात्र अशा प्रकारचे आश्वासन देताना आपण काहीतरी विसरत आहोत याचे भान त्यांना राहिले आहे असे दिसत नाही.

कोल्हापूर, इचलकरंजी या दोन महापालिकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर ते काहीसे सक्रिय झाले आहेत. कोल्हापूर महापालिकेत गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेस आघाडीची सतेज पाटील यांची सत्ता होती पण त्यांनी कोल्हापूरसाठी काहीही केलेले नाही. कोल्हापूरचा विकास झालेला नाही. आता या निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेचे सत्ता आमच्याकडे द्या, (transform)कोल्हापूरचा कायापालट करू असे खासदार धनंजय महाडिक म्हणतात. पण काँग्रेस आघाडीच्याही आधी जवळपास 18 वर्षे या महापालिकेची सत्ता महादेवराव महाडिक यांच्याकडे होती तर मग त्यांच्या काळात कोल्हापूरचा काय विकास झाला ? या प्रश्नाचे ते काय उत्तर देणार आहेत?
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती यांच्या निवडी करायच्या. महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी, महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात यायचे. एकदा निवड करून झाली की या महापालिकेकडे ढुंकून पहावयाचे नाही. आपण निवडलेले पदाधिकारी कशा प्रकारचे काम करतात याची साथी चौकशी सुद्धा करायची नाही. अशा प्रकारची सत्ता महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेत राबवली मात्र कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही. कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीसाठी त्यांनी कधी आंदोलनाची भाषा केल्याचे ऐकिवात नाही. कोल्हापूर महापालिकेला केंद्राचा आणि राज्याचा मोठा निधी आणला आहे असेही कधी घडले नाही. त्यामुळे कोल्हापूर आज जे काही आहे त्याचे उत्तरदायित्व महादेवा महाडिक यांच्याकडेही जाते.
धनंजय महाडिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नेमके काय केले हा संशोधनाचा विषय आहे. महापुराच्या काळात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी त्यांनी बास्केट ब्रिज मंजूर करून आणला. त्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यालाही तीन वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे पण बास्केट ब्रिज हा अद्याप तरी कागदावरच आहे. (transform)कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीसाठी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. केंद्रीय मंत्र्यांना ते निवेदने देतात, त्याची बातमी होते पण प्रत्यक्षात पुढे काय झाले हे समजून येत नाही.
महादेवराव महाडिक यांच्या हातातून कोल्हापूर महापालिकेची सत्ता सूत्रे सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी खेचून घेतले. जवळपास पंधरा वर्षे त्यांच्याकडेच या महापालिकेची सत्ता होती. त्यांच्या कार्यकाळात काळमवाडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन पाणीपुरवठ्याची योजना मंजूर झाली आणि ती पूर्णही झाली. पण ती अद्यापही पूर्ण क्षमतेने चालू नाही. या मंडळींनी कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत. इतकेच नव्हे तर हसन मुश्रीफ वगळता सतेज पाटील यांनीहद्द वाढीला विरोधच केला.
कुणाल कुमार हे कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोल्हापूर शहर हे आय.टी. हब झाले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांची बदली झाल्यानंतर किमान इथल्या लोकप्रतिनिधींनी आयटी हब साठी पाठपुरावा करणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. एकूणच इतर महानगरांच्या तुलनेत कितीतरी वर्षे कोल्हापूरला मागे ठेवण्यास महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी आणि काँग्रेस आघाडी जबाबदार आहे.
हेही वाचा :
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान