साराचं लग्न केव्हा होणार? गिलच्या द्विशतकानंतर थेट सचिनलाच प्रश्न

शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध द्विशतक ठोकलं. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल(social) मीडियावर शुबमन आणि साराचं नाव एकमेकांसह जोडलं गेल्याचं पाहायला मिळत आहे.


रोहित शर्मा याच्या कसोटी निवृत्तीनंतर युवा शुबमन गिल(social) याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. संघात अनेक अनुभवी खेळाडू असूनही शुबमनला नेतृत्व देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. मात्र शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्येच धमाका केला. शुबमनने यासह टीम मॅनेजमेंटने त्याला कर्णधार करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवून दाखवला आहे.

शुबमनने लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटीतील पहिल्या सामन्यात(social) कर्णधार म्हणून शतक केलं. तर दुसऱ्या सामन्यात शुबमनने आणखी एक पाऊल पुढे टाकत द्विशतक ठोकलं. शुबमनच्या या खेळीनंतर त्याचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. तर काही अतिउत्साही नेटकऱ्यांनी शुबमनसह पुन्हा एकदा सारा तेंडुलकरचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला आहे. शुबमनच्या विक्रमी द्विशतकी खेळीनंतर गिल आणि साराच्या इनिंगला केव्हा सुरुवात होणार? असा प्रश्न सोशल मीडियावरुन विचारण्यात आला आहे.

रवींद्र जडेजा आणि शुबमन या जोडीने सहाव्या विकेटसाठी 203 धावांची ऐतिहासिक द्विशतकी भागीदारी केली. त्यानंतर भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने एक्सवर पोस्ट करत या 2 भारतीय फलंदाजांचं अभिनंदन केलं. सचिनने या दोघांचे फोटो पोस्ट करत अभिनंदन केलं. सचिनच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत साराचं लग्न केव्हा होणार? असा प्रश्न विचारला.
“अखेर केव्हा साराच्या लग्नाची गोड बातमी आम्हाला मिळणार आहे. शुबमन गिल पुढील डावासाठी सज्ज आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. नेटकऱ्यांकडून आतापर्यंत अनेकदा सारा आणि शुबमन या दोघांचा नाव जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच नेटकऱ्यांनी सारा आणि शुबमचे एडीटेड फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

‘मी गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला सिंगल आहे. माझं नाव वेगवेगळ्या लोकांसोबत जोडलं जातं, मात्र या अफवा आहेत. कधी कधी त्याचा इतका त्रास होतो की, ज्या व्यक्तीला आयुष्यात कधी पाहीलं नाही. ज्याच्यासोबत बोललो नाही, त्याच्यासोबत नाव जोडलं जातं”, असं शुबमनने काही महिन्यांपूर्वी ‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला’ दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
दरम्यान शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक द्विशतक ठोकलं. शुबमन यासह इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. शुबमनने 387 बॉलमध्ये 30 फोर आणि 3 सिक्ससह 269 धावांची खेळी केली.

हेही वाचा :

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर.. 

SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान