Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट

Volkswagen कंपनी आपल्या कार्सवर दमदार डिस्काउंट देत आहे. (more)तसेच यात विविध बेनिफिट्सचा देखील समावेश आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

भारतीय मार्केटमध्ये विविध कंपन्या चांगल्या आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत आहे. ग्राहकांचे लक्ष देखील या नवीन कारकडे जात असते. मात्र, जर एखाद्या ग्राहकाला कार (more)खरेदी करण्यास प्रवृत्त करायचे असेल, तर आकर्षक डिस्काउंट देणे महत्वाचे असते. अशातच आता आघाडीची कार उत्पादक कंपनी Volkswagen आपल्या कारवर दमदार डिस्काउंट देत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

फोक्सवॅगनने भारतीय मार्केटमध्ये त्यांचा वार्षिक ऑटोफेस्ट 2025 कार्यक्रम सुरू केला आहे. तो जुलै 2025 च्या अखेरपर्यंत चालेल. या अंतर्गत, कंपनी ग्राहकांना एक्सचेंज बेनिफिट्स,(more) फायनान्स स्कीम्स, लॉयल्टी रिवॉर्ड्स आणि उत्तम सेवा पॅकेजेससह अनेक उत्तम ऑफर्स देत आहे. चला जाणून घेऊया जुलै 2025 मध्ये फोक्सवॅगन कारवर किती सूट मिळत आहे.

ऑटोफेस्ट 2025 मध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना एक्सचेंज आणि लॉयल्टी बेनिफिट्स मिळतील. कंपनी विशेष फायनान्स योजना देत आहे. ग्राहकांना मोफत वाहन मूल्यांकन आणि टेस्ट ड्राइव्ह दिली जात आहे, ज्यामुळे ग्राहक जी कार खरेदी करणार आहेत त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. कंपनी ऑटोफेस्ट 2025 अंतर्गत ग्राहकांना सर्व्हिस आणि मेंटेनन्सच्या ऑफर देखील देत आहे.

या मॉडेल्सवर मिळत आहे फायदे
जुलै 2025 मध्ये फोक्सवॅगन त्यांच्या लोकप्रिय सेडान Virtus आणि एसयूव्ही Taigun वर ही ऑफर देत आहे. ग्राहकांना त्यांच्या जुन्या कारच्या बदल्यात 1 लाख रुपयांपर्यंत एक्सचेंज आणि लॉयल्टी रिवॉर्ड मिळू शकतात. टायगुनवर एकूण 2.5 लाख रुपयांपर्यंत आणि व्हर्टसवर 1.7 लाख रुपयांपर्यंत सूट आहे.

काय लूक आहे बॉस ! भारतात लाँच झाली गिअरवर चालणारी Electric Bike, सिंगल चार्जमध्ये मिळणार 172 KM ची रेंज

भारतात फोक्सवॅगनची सध्याची लाइनअप कशी आहे?
Volkswagen Taigun: 11.80 लाख ते 19.83 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Volkswagen Virtus: 11.56 लाख ते 19.40 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Volkswagen Tiguan R-Line: 49 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Volkswagen Golf GTI: 53 लाख रुपये (एक्स-शोरूम)

हेही वाचा :

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर.. 

SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान