भारतात दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. खरंतर, पूर्वी बाईक(Bike) खरेदी करताना त्याची किंमत व मायलेज किती? या दोन गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जायचे. मात्र, आता ही स्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. आजचा ग्राहक हा बाईकच्या लूककडे देखील आवर्जून पाहतो.

आजच्या ग्राहकाला आपल्या बाईकचा(Bike) लूक एकदम हटके हवा असतो. ग्राहकांची हीच मागणी पाहता, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार लूक असणाऱ्या बाईक लाँच करत आहे. नुकतेच होंडाने देशात अनेक दमदार बाईक ऑफर केल्या आहेत.
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये वाहनं विकते. कंपनीने अलीकडेच एक पॉवरफुल इंजिन असलेली नवीन बाईक लाँच केली आहे. चला या बाईकबद्दल जाणून घेऊया.
Honda Rebel 500 लाँच
जपानी दुचाकी उत्पादक कंपनीने भारतात 500 सीसी सेगमेंटमधील नवीन क्रूझर बाईक(Bike), होंडा रिबेल 500 लाँच केली आहे. त्याची डिलिव्हरी देखील काही दिवसांत कंपनीकडून सुरू केली जाईल.
दमदार इंजिन
होंडा रिबेल 500 बाईक 471 सीसी लिक्विड कूल्ड चार सिलेंडर, आठ व्हॉल्व्ह इंजिनने सुसज्ज आहे. ज्यामुळे या बाईकला 34 किलोवॅटची पॉवर आणि 43.3 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. पॅरलल ट्विन इंजिन असलेल्या या बाईकमध्ये सहा स्पीड गिअरबॉक्स आहे.

फीचर्स
कंपनीने नवीन बाईकमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट, एलईडी इंडिकेटर, समोर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ड्युअल शॉक अॅब्झॉर्बर, दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस, 16 इंच टायर्स, एलसीडी डिस्प्ले, 690 मिमी सीटची उंची अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले…
नवीन बाईकच्या लाँचिंगप्रसंगी बोलताना, होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाचे सेल्स आणि मार्केटिंगचे डायरेक्टर योगेश माथूर म्हणाले, “आम्हाला भारतात रिबेल 500 आणताना खूप आनंद होत आहे. ही एक अशी बाईक आहे ज्याची रायडर्स वर्षानुवर्षे वाट पाहत होते.”
किंमत
होंडा रिबेल 500 फक्त एकाच व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.12 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक होंडाच्या प्रीमियम डीलरशिप बिग विंग द्वारे ऑफर केली जाईल. सध्या, बाईकची बुकिंग सुरू झाली आहे आणि त्याची डिलिव्हरी जून 2025 पासून सुरू होईल.
यांच्यासोबत असेल स्पर्धा
होंडाची नवीन बाईक रिबेल 500 ही 500 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही बाईक भारतीय बाजारात रॉयल एनफील्ड क्लासिक 650, शॉटगन 650, सुपर मीटीओर 650 आणि कावासाकी एलिमिनेटर सारख्या क्रूझर बाईकशी थेट स्पर्धा करेल.
हेही वाचा :
‘तो पेल दुंगा’, अंपायरच्या एका निर्णयानंतर कुलदीप यादवचा थयथयाट
सापाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते आजोबा इतक्यात…; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
त्यावेळी नरेंद्र मोदींनाच भाजपातून काढण्याच निर्णय झाला…; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट