सापाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते आजोबा इतक्यात…; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी अंगावर काटा आणणारे, तर मजेशीर असे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट(Stunt), जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे धोकादायक स्टंटचे प्रमाण वाढत चालले आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तर स्टंट(Stunt) सुरुच असतात. तसेच काहीजण स्वत:ला शूर दाखवण्यासाठी धोकादायक अशा गोष्टी करतात. यामध्ये विशेष करुन तरुणांचा देखील समावेश असतो. सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी, लोकांपुढे हिरोगिरी दाखवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायला मागे-पुढे पाहत नाही.

सध्या असाच एक धोकादायक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजोबा सापाच्या डोळ्यात डोळे घालून बघत आहेत. परंतु आजोबांना हा स्टंट जीवावर बेतला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टेबलावर एक साप फणा काढून बसला आहे. तिथेच एक आजोबा सापाकडे कटाक्षपणे बघत आहेत.

बाजूला त्यांचा नातू देखील बसलेला दिसत आहे. आजोबा त्या सापाशी बोलत देखील आहे. परंतु अचानक साप फणा काढतो आणि आजोबांच्या डोळ्यावर हल्ला करतो. हा व्हिडिओ इथेच संपतो. परंतु हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @17__saber या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “भाऊ, मृत्यूशी खेळत आहे” असे एका युजरने म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने कशाला उगाच हिरोगिरी करायची असे म्हटले आहे. तर अनेकांनी काही गिफ इमोजी शेअर केलेले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, काही काळाच्या प्रसिद्धीसाठी आणि प्रशंसेसाठी असे धोकादायक स्टंट करणे कितपत योग्य आहे.

हेही वाचा :

उद्यापासून सुरु होणार गुगलचा सर्वात मोठा ईव्हेंट! 

‘बॉलिवूडला अंडरवर्ल्डमधूनच…’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक गौप्यस्फोट

‘तो पेल दुंगा’, अंपायरच्या एका निर्णयानंतर कुलदीप यादवचा थयथयाट

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत…? कसला आनंदोत्सव….? प्रकाश आंबेडकरांचे खरमरीत टीकास्त्र

 “मुंबई बॉम्बस्फोटांनी उद्ध्वस्त…” मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाचा फोन, पोलिस सतर्क