पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत…? कसला आनंदोत्सव….? प्रकाश आंबेडकरांचे खरमरीत टीकास्त्र

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवादी हल्ला(attack) करण्यात आला. यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने भारतीय सैन्याची ताकद दाखवून दिली. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असून राजकीय पक्षांकडून तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,”नरेंद्र मोदीजी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? जवळजवळ एक महिना उलटून गेला! तुम्ही काय साजरे करत आहात? हल्ल्यात(attack) मृत्युमुखी पडलेल्यांच्या पत्नींना अद्याप न्याय मिळालेला नाही!” अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. देशभरामध्ये सुरु असलेल्या तिरंगा रॅलीवरुन त्यांनी निशाणा साधला आहे.

भाजप नेत्यांकडून देशातील विविध राज्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याचे कौतुक करणाऱ्या रॅली काढल्या जात आहेत. या विजयी रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये योगी आदित्यनाथ यांनी तिरंगा रॅली आयोजित केली होती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यात रॅली काढली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे तिरंगा ऱॅलीमध्ये सहभागी होत आनंदोत्सव साजरा केला. मात्र यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न केला आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील शस्त्रसंधी झालेली असताना देशामध्ये राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या आनंदोत्सवाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, अमित ठाकरे यांनी लिहिले आहे की, “सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे.

ही परिस्थिती विजयाची नसून Ceasefire (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत, असे स्पष्ट मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

70 वर्षांच्या स्टारचा 42 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन…

थरारक! रस्ता ओलांडताना महिलेचा उडाला गोंधळ ; भरधाव रिक्षाची धडक बसली अन्… , Video Viral

आठवले यांची पुन्हा एकदा आरपीआय एकत्रीकरणाची साद