भारत POK च्या 60 किमी आत घुसला अन्…; पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद

नवी दिल्ली: आज दिवसभरात पाकिस्तानने(Pakistani) केलेल्या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. तसेच भारताने राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, करकही, रावळपिंडी या महत्वाच्या ठिकाणी जोरदार हल्ला केला आहे. भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील 60 किमी आत घुसला असल्याचे समजते आहे.

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे(Pakistani) 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. राजधानीवर देखील भारताने हल्ला केला आहे. तर भारतीय नौदललाने आयएनएस विक्रांतने पाकिस्तानच्या कराची बंदरावर मोठा हल्ला केला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानने भारतावर मिसाईन आणि ड्रोन अटॅक सुरु केला आणि त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्यर दिले आहे. भारताच्या अनेक ठिकाणी पाकिस्तानने गोळीबार करण्यास सुरुवात केली मात्र भारताने प्रतित्युत्यर दिल्यानंतर आता भारताने लाहोरमध्ये कारवाई केली आहे. भारताने चार विमान नेस्तनाबूत केली आहे अशी माहिती समोर आली आहे. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि यामध्ये असे सांगण्यात आले आहे की पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटामुळे हादरल्याची माहिती समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु होताच भारतामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेक निर्णय घेतले जात आहेत. राजधानी दिल्लीच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमधील इंडिया गेट रिकामे करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच इंडिया गेटचा सर्व परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना इंडिया गेटपासून लांब जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इंडिया गेटच्या बाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

भारत पाकिस्तान(Pakistani) युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील आठ आश्चर्यापैकी एक असलेले आणि भारताच्या पर्यटनातील महत्त्वपूर्ण वास्तू असलेले ताजमहाल देखील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ताजमहालच्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या 1971 च्या युद्धावेळी देखील ताजमहाल झाकून ठेवण्यात आला होता. यावेळी देखील ताजमहालची सुरक्षा वाढवली आहे.

पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय तिन्ही दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी करण्यात आली आहे. LOC वर देखील गोळीबार सुरु झाला असून सीमा भागामध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. परिसरामधील लाईट, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. भारताने इस्लामाबाद, कराचीवर हल्ला करण्यात आला. कराची बंदरावर देखील भारताच्या आयएनएस विक्रांत कडून हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या शहरांमध्ये भारताच्या वायू दलाने हल्ला केला आहे. पाकिस्तान सेनेच्या मुख्यालयावर देखील भारताने हल्ला केला आहे.

हेही वाचा :

रात्री विवस्त्र झोपणे शुभ आहे की अशुभ? हे मोठे रहस्य जाणून घ्या, अन्यथा…

ब्लॅक फ्रायडे! भारत-पाकिस्तान घडामोडींच्या झळा, शेअर बाजार घायाळ

9 मे ची रात्र चमत्कारिक! ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार