यूएसच्या कोटन कंपनीने 2014 मध्ये केलेल्या रिसर्चमध्ये असं आढळून आले की, 57 टक्के लोक रात्री न्यूड म्हणजे कपडे न घालता झोपल्यास(sleep) ते आपल्या रिलेशनशिपमध्ये आनंदी असतात. त्यासोबत विवस्त्र झोपल्यास आरोग्यासही अनेक फायदे होतात असं तज्ज्ञ सांगतात. पण ज्योतिषशास्त्र हे आपल्या देशातील महान प्राचीन शास्त्रीय ज्ञान आहे. यातही आपल्या अनेक व्यवहारातील गोष्टींबद्दल नियम सांगण्यात आले आहे.

जे आपल्याला चांगले आणि वाईट यात फरक करण्यास सांगतात. रात्रीच्या झोपेशी संबंधित अनेक नियम ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. झोपेसंदर्भात ज्योतिषशास्त्रात चुकीच्या गोष्टी केल्यास त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. त्याशिवाय संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम आजारांच्या स्वरूपात भोगावे लागतो, असं शास्त्रात सांगण्यात आलंय.
बरंच लोक त्यांची पर्स उशाजवळ ठेवून झोपतात(sleep). ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे चुकीचे मानलं जातं. या कृतीमुळे, माता लक्ष्मी दुःखी होऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे, बेडजवळून बूट आणि चप्पल काढण्याची चूक कधीही करू नये. यामुळे व्यक्ती आजारांनी वेढलेली असू शकतं.
ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री झोपताना लॅपटॉप, मोबाईल फोन, पुस्तके, तेल, औषधं इत्यादी वस्तू बेडवर किंवा डोक्याजवळ चुकूनही ठेवू नयेत. असे केल्याने तुमची झोप बिघडू शकतं. तसंच, ती औषधे जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे तुमचे आयुष्यभराचे साथीदार बनू शकतात.
रात्री झोपताना पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. यासाठी तो जवळच पाण्याने भरलेली बाटली ठेवतो. ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानलं जातं. यामुळे, प्रगतीपथावर असलेले काम अडकू लागते आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री कधीही विवस्त्र म्हणजे अंगावर कपडे नसताना झोपू नये. ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे शुभ मानले जात नाही. यामुळे नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते, असं सांगण्यात आले आहे. शिवाय, आरोग्य आणि संपत्तीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. पण फक्त अंतर्वस्त्र घालून झोपण्याचा प्रयत्न करा, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना झटका! सरकारने घेतला मोठा निर्णय
मनसेचा मनपा प्रशासनाला इशारा 24 तासांत ध्वज बदला अन्यथा….
9 मे ची रात्र चमत्कारिक! ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार