पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये पडलेली फुट ही भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे. मागील निवडणुकीत ९८ जागा जिंकणाऱ्या भाजपकडून(political) महायुती एकत्र लढली तर जास्त जागा देण्याची शक्यता नाही. तर महाविकास आघाडी कदाचित पुण्यात एकत्रित निवडणुक लढण्याची शक्यता अधिक आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. शहरातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता, तुर्तास भाजपचे पारडे जड आहे. लाेकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने जाेरदार कमबॅक केले आहे. मागील निवडणुकीचा विचार करता, शिवसेना(political) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यात उभी फुट पडली आहे.
२०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजप हा सर्वांत माेठा पक्ष ठरला हाेता. जवळ जवळ ९८ नगरसेवक त्यांचे निवडुन आले हाेते. त्या खालाेखाल राष्ट्रवादी काॅंग्रेस , शिवसेना आणि काॅंग्रेस यांचा क्रमांक हाेता. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेत उभी फुट पडली आहे. याचा थेट फायदा भाजपला हाेणार यात शंका नाही.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मागील निवडणुकीत ४१ नगरसेवक निवडून आले हाेते. राष्ट्रवादी काॅंग्रेसची ताकद ही विशेषत: शहराच्या उपनगर – ग्रामीण भागात जास्त आहे. पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस बराेबर २३ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस बराेबर १८ इतके नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडुन आले हाेते.
शिवसेनेत(political) फुट पडल्यानंतर नाना भानगिरे हे शिंदेंच्या शिवसेनेसाेबत गेले. विधानसभा निवडणुकीपुर्वी अविनाश साळवे हे काॅंग्रेसमध्ये गेले. तर काही महीन्यापुर्वी संगीता ठाेसर, बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर पृथ्वीराज सुतार, संजय भाेसले, श्वेता चव्हाण हे ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहीले आहेत. तर मनसेला साेडचिठ्ठी देत वसंत माेरे हे ठाकरेंच्या शिवसेनेसाेबत सध्या आहेत.

काॅंग्रेसची महापालकेतील नगरसेवकांची संख्या गेल्या तीन निवडणुकांत कमी हाेत गेली हाेती. मागील निवडणुकीत दहा हाेती. त्यापैकी माजी आमदार आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. मनसेचा सध्या एकच नगरसेवक आहे, तर आरपीआयचे मागील निवडणुकीत पाच नगरसेवक हे भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडुन आले हाेते.
एकुणच पक्षीय बलाबलाचा विचार करता महायुतीत भाजपचे पारडे हे जड राहणार आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार ), शिवसेना (शिंदे ) आणि आरपीआय यांच्या वाट्याला भाजपकडून अपेक्षित जागा दिल्या जाऊ शकत नाही. आम आदमी पार्टी कितपत प्रभाव पाडणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
रात्री विवस्त्र झोपणे शुभ आहे की अशुभ? हे मोठे रहस्य जाणून घ्या, अन्यथा…
ब्लॅक फ्रायडे! भारत-पाकिस्तान घडामोडींच्या झळा, शेअर बाजार घायाळ
9 मे ची रात्र चमत्कारिक! ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार