कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (leader)यांच्या विचारांचा समान धागा असूनही विविध गटात विभागलेल्या नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीची विण गेल्या अनेक वर्षांपासून उसवली आहे. आंबेडकरी जनतेच्या रेट्यातून हे सर्व गट काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एकत्र आले होते पण हे ऐक्य अल्पकाळ सुद्धा टिकले नाही. हा कटू अनुभव असूनही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा एकत्रिकरणाची साद घातली आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री पद सुद्धा पणाला लावण्याची तयारी बोलून दाखवली आहे. आता पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेने त्यासाठी रेटा लावण्याची गरज आहे.

शेकडो वर्षे गुलामगिरीत अडकून पडलेल्या मागास समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर पी आय ची स्थापना केली पण त्यांच्या पश्चात ही संघटना एक संघ राहिली नाही. बारा बलुतेदार आणि अठरा आलूतेदार यांचाही आरपीआय मध्ये विचार केला गेला होता पण दुर्दैवाने ही संघटना एसटी (शेड्युल्ड ट्राईब) मर्यादित राहिली. त्याला कारण नेतेच होते. एका मर्यादित जात समूहाचा विचार करूनही महत्त्वकांक्षी नेत्यांनी संघटना फोडली. तिचे अनेक गटात रूपांतर झाले. हा खरे तर आंबेडकरी विचारांचा एका अर्थाने पराभवच होता.
बऱ्याच वर्षांपूर्वी आंबेडकरी(leader) चळवळीतील विचारवंतांनी ऐक्याची भूमिका मांडली होती. मग जनतेने एकत्र येऊन दबाव आणला. त्यातून मग आर पी आय चे सर्व गट एकत्र आले. सामूहिक नेतृत्वाची संकल्पना पुढे आली पण प्रकाश आंबेडकर यांना एकमुखी नेतृत्व हवे होते. त्यातून एकत्र आलेले गट पुन्हा आपापल्या तंबूत परतले. आर पी आय ही संघटना अनेक गटात विभागणी केली असली तरी आज रामदास आठवले यांना सर्वाधिक समर्थन आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व मानणारा वर्ग आहे. वास्तविक हे सर्व गट एकत्र आले असते तर किमान महाराष्ट्रात त्यांना सत्तेत मोठा वाटा मिळाला असता.
तथापि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने आर पी आय ला एकत्र येऊ नये यासाठीची एक उत्तम व्यवस्था केली होती. आंबेडकरी चळवळीतील केडर बेस असलेल्या नेत्यांना सत्तेच्या वर्तुळात त्यासाठी आणले होते.
उत्तर प्रदेश मधील कांशीराम यांचे बरेचसे आयुष्य नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात गेले होते. बामसेफ संघटनेत ते प्रभावी नेते म्हणून समजले जात होते. त्यांनी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा अभ्यास केला होता. समाजातील सर्व मागास घटकांना एका झेंड्याखाली आणले तर स्वतः हस्तगत करता येऊ शकते. हा विचार घेऊन त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये मायावतींना सोबत घेऊन पक्ष बांधणी केली आणि एकदा नव्हे दोन वेळा तेथील सत्ता सूत्रे हाती घेतली होती. कांशीराम आणि मायावती यांनी सत्तेचा सोपान कसा चढायचा याचे एक उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना दिला होता.
जे उत्तर प्रदेश मध्ये घडू शकते तेच शाहू फुले आंबेडकरांच्या(leader) महाराष्ट्रात का घडू शकत नाही? असा विचार करून अनेक गटांमध्ये विभागले गेलेले नेते एकत्र आले असते तर महाराष्ट्रातील सत्तेत ते भागीदार बनले असते. दुर्दैवाने हे सर्व गट स्वतःच्या सुभेदारीवर समाधानी होते. यातील बऱ्याच गटांनी सत्ताधाऱ्यांच्या समोर आपले एक वेगळे उपद्रवमूल्य निर्माण केले होते. पण त्याचा एकत्रित परिणाम काय होतो हे तपासण्याची संधी या नेत्यांनी घेतलेली नाही.
गायकवाड, खोब्रागडे, रा. सु. गवई, बी सी कांबळे, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर अशा कितीतरी गटामध्ये आर पी आय हा विभागला गेला. आठवले आणि आंबेडकर यांच्या मागे जन समर्थन आहे. पण या दोन्ही नेत्यांच्या जबरदस्त महत्वकांक्षा आहेत. पण आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोन पावले मागे जाण्याची तयारी ठेवून आरपीआय गटांना एकत्र येण्याची साध घातली आहे. त्यासाठी त्यांनी एकत्रित गटाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सोपवण्याची तयारी दाखवली आहे. समाजापेक्षा मंत्रीपद मोठे नाही असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी केलेल्या एकत्रीकरणाच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर यांच्याकडून किती प्रतिसाद मिळतो यावर बरेचसे काही अवलंबून आहे. आंबेडकरी जनतेने सुद्धा त्यासाठी एकत्र येऊन यांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रकाश आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना एकत्र आणून बहुजन समाज वंचित आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून ते आपले उपद्रवमूल्य सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असल्याचे अधून मधून दिसून येतात. बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांना एकत्र आणले आहे. सोशल इंजिनियरिंगचाही प्रयोग केला आहे. वंचितच्या माध्यमातून सत्तेच्या वर्तुळात जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
आघाडीच्या निमित्ताने त्यांना स्वतःचा अजेंडा राबवायचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून रामदास आठवले यांच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळतो हे ठामपणाने सध्या तरी सांगता येत नाही. आरपीआयचे सर्व गट एकत्र आले आणि एकत्रित गटाचे नेतृत्व आपल्याकडे आले तरी सर्वांचा विचार घेऊन, सर्व गटाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांना काम करावे लागेल, मात्र त्यांना स्वतःचा अजेंडा राबवता येणार नाही.
हेही वाचा :
टीम इंडियाची Asia Cup मधून माघार! पाकिस्तानशी BCCI ने सर्व क्रिकेट संबंध तोडले..
राज्यातील शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी बातमी समोर!
थरारक! रस्ता ओलांडताना महिलेचा उडाला गोंधळ ; भरधाव रिक्षाची धडक बसली अन्… , Video Viral