भारत(Team India) आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडत असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम क्रिकेट या घटकावर दिसून येत आहेत. जगभरातील क्रिकेटप्रेमी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात, क्रीडा विश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची ओढ असते. आता मात्र भविष्यात हे दोन संघ मैदनात एकत्र क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत.

कारण, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून भारत पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, आता बीसीसीआयने देखील पाकिस्तानशी सर्व क्रिकेट संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेऊन बीसीसीआयने कठोर एक पाऊल पुढे टाकले आहे.
एक्सप्रेस स्पोर्ट्समधील एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून(Team India) आगामी आशिया कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारत दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पाकिस्तानसोबत भारताचे संबंध खूप ताणले गेले आहेत. भारतीय संघ आगामी आशिया कप स्पर्धेत भाग घेणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा करार करण्यात आल्यानंतर बीसीसीआयकडून आशिया कप संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या म्हटले होते की, आता जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद्यां आणि नियंत्रण रेषेवरच हौस शकते.

सद्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी हे एसीसीचे अध्यक्ष आहेत, अशा परिस्थितीत बीसीसीआय आशिया कपमधून माघार घेण्याच्या विचारात आहे. अहवालात म्हटल्याप्रमाणे, बीसीसीआयने आशिया कपमधून माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल एसीसीलाही माहिती कळवली आहे.
INDIA OPTS OUT FROM ASIA CUP.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2025
– The BCCI decides to not participate in the upcoming Asia Cup. (Express Sports). pic.twitter.com/DARU2lameb
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानकडून पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यानंतर या सर्व गोष्टींचा परिणाम हा सर्वच क्षेत्रात झालेला दिसून येत आहे. त्यात आता क्रिकेट देखील मागे राहिले नाही. बीसीसीआयनेही पाकिस्तानसोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याबाबत बीसीसीआयने आयसीसीला या आधीच पत्र पाठवले आहे.
हेही वाचा :
बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना रद्द
पालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजप नेत्यांकडून डाव टाकण्यास सुरूवात
शिंदे गटाच्या आमदाराने भाजप कार्यकर्त्याला केली मारहाण, दिली जीवे मारण्याची धमकी