रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने( Virat Kohli) आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बंगळुरूमध्ये आरसीबी संघाची विजयी रॅली निघाली मात्र या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसले सह तीन लोकांना अटक केली आहे. त्याला मुंबईला जाताना एअरपोर्टवरून अटक करण्यात आली आहे.
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी आपल्या FIR मध्ये नमूद केलं आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला( Virat Kohli) स्टेडियममध्ये कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेण्याची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीदेखील संघ व्यवस्थापन, स्टेडियमचे प्रशासन आणि आयोजकांनी मिळून एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आणि त्यामुळे खूप गर्दी निर्माण झाली. ही गर्दी काही काळातच नियंत्रणाबाहेर गेली आणि दुर्घटना घडली.
निखिल सोसलेच्या लिंकडिन प्रोफाइलनुसार तो आरसीबीचा बिजनेस पार्टनरशिप, मार्केटिंग आणि रेवेन्यू प्रमुख आहे. निखिल सोसले हा एक आरसीबी संघातील एक प्रमुख स्टाफ मेंबर आहे जो फ्रेंचायझीसाठी पीआर आणि ब्रांड मार्केटिंगचं काम करतो. निखिल हा आरसीबी संघाच्या जबरदस्त ब्रॅण्डिंग मागचा चेहरा आहे. तो संघाला आयपीएलमध्ये एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवण्यासाठी रणनीती डिझाईन करतो.
निखिल सोसलेची पत्नी मालविका नायक ही अनुष्का शर्माची खास मैत्रीण असून दोघी अनेकदा स्टॅन्डमध्ये एकत्र बसून आरसीबीचा सामना पाहतात. दोघी मागील अनेक वर्षांपासून एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. मालविका नायकच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार तिने Manipal Academy of Higher Education मधून एमबीएचं शिक्षण घेतलं असून ती सध्या Innoz Technologies Pvt. Ltd या बिझनेस डेव्हलमपेंट आणि पार्टनरशिपची देखरेख करते.
हेही वाचा :