मल्याळम अभिनेता Shine Tom Chacko चा अपघात, वडिलांचा जागीच मृत्यू!

मल्याळम अभिनेता(actor) शाईन टॉम चाको आणि त्याच्या कुटुंबाचा कार अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी तामिळनाडूजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात टॉम चाकोच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर, अभिनेता आणि कुटुंबातील इतर सदस्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अभिनेत्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे चाहते थक्क झाले आहेत. अभिनेता आता रुग्णालयात दाखल आता त्याचा जीव थोडक्यात वाचवला आहे.

हा अभिनेता (actor)त्याच्या पालकांसोबत प्रवास करत होता. मनोरमा वृत्तपत्राच्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता तामिळनाडूतील धर्मपुरीजवळील पलाकोट्टईजवळ घडली. चाको त्याच्या ड्रायव्हर, पालक आणि भावासह कारमधून प्रवास करत होता. अचानक त्याची कार समोरून येणाऱ्या लॉरीला धडकली.

चाकोचे वडील सीपी चाको यांचा जागीच मृत्यू झाला, तर अभिनेत्यावर, त्याच्या भावावर आणि ड्रायव्हरवर सध्या पलाकोट्टई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्णपणे खराब झालेल्या कारचे फोटो ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. डॉक्टर चाकोवर उपचार करत आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत.

शाईन टॉम चाकोला एका महिन्यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. एका अभिनेत्रीने त्याच्यावर ड्रग्जच्या नशेत तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. अभिनेत्रीने असा दावा केला होता की तो त्याच्या चित्रपटांच्या सेटवरही ड्रग्जचे सेवन करायचा आणि संपूर्ण क्रू आणि प्रोडक्शन युनिटला त्याच्या वागण्याबद्दल माहिती होती.

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी चाको राहत असलेल्या हॉटेलवर छापा टाकला आणि तो ड्रग्जचे सेवन करत असल्याचा आरोप होता, परंतु पोलिसांच्या उपस्थितीची सूचना मिळताच तो तेथून पळून गेला. नंतर त्याला पकडण्यात आले आणि अटक करण्यात आली, परंतु त्याच दिवशी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्याला केरळ सरकारच्या व्यसनमुक्ती कार्यक्रम ‘विमुक्ती’ अंतर्गत पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले.

 

हेही वाचा :