‘गर्दी करा तरच गाईन…’ नेहा कक्करचं ‘ते’ रडगाणं नाटकी? इवेंट प्लॅनर्सकडून सेलिब्रिटीचा भांडाफोड

मार्च महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं सेलिब्रिटी(Celebrity) गायिका नेहा कक्करचा कॉन्सर्स पार पडला. या कॉन्सर्टचे बरेच व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, इथं चर्चा नेहाच्या गाण्यांची नाही, तर तिच्या रडगाण्याची झाली.

मेलबर्नमधील कॉन्सर्टसाठी तीन तास उशिरानं पोहोचल्यानंतर चाहत्यांनी खिल्ली उडवताच नेहाला(Celebrity) व्यासपीठावरच रडू कोसळलं. या कॉन्सर्टनंतर नेहानं आयोजकांवर आपले पैसे लाटल्याचा आरोप केला होता. इतकंच नव्हे, तर आपल्या टीमला हॉटेल, खाणं आणि पाणीसुद्धा न दिल्याचा दावा करत तिनं आरोप केले.

ज्यानंतर आता गायिकेचे हे आरोप पाहता ऑस्ट्रेलियातील इवेंट ऑर्गनायजर्स पेस डी आणि विक्रम सिंग रंधावा यांनी नेहानं मांडलेली बाजू पूर्णपणे खोटी असल्याचं सांगत तिनंच 700 उपस्थितांसमोर गाण्यास नकार दिल्याची बाब उघजकीस आणली.

सिद्धार्थ कण्णनसोबत संवाद साधताना आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार नेहाचे ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन दिवस शो होते. यापैकी सिडनीतील कॉन्सर्टला 1500 ते 2000 चाहत्यांची गर्दी झाली होती. मेलबर्नमधील शोसाठी मात्र 700 चाहत्यांचीच उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यातही नेहा तीन तास उशिरा पोहोचली होती. ‘चाहत्यांनी तासन् तास वाट पाहिली आणि त्यांनी अखेर तिच्यावर संताप व्यक्त केला’, असं सांगत आयोजकांनी या कॉन्सर्सटासाठी प्रत्येकी 300 AUD म्हणजे साधारण 16000 रुपयांचं तिकीट काढलं होतं.

इथंही नेहानं(Celebrity) इतक्या कमी उपस्थितांपुढे परफॉर्म करण्यास नकार दिल्याचं सांगत जोपर्यंत स्टेडियम पूर्ण भरत नाही, तोपर्यंत परफॉर्म करणार नाही अशी अजब अट तिनं आयोजकांपुढे ठेवली. साऊंड ट्रॅक नाही आणि आयोजकांनी साऊंड इंजिनिअरना पैसे दिले नाहीत असे आरोप नेहानं केले असतानाच तिचे सर्व आरोप आयोजकांनी धुडकावून लावले.

नेहासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून, हॉटेलखाली कार उभ्या होत्या, रुमची बुकिंग होती. जर हॉटेलच नव्हतं तर ती तिथं राहिली होती कुठे? असा उलट प्रश्न आयोजकांनी करत तिच्या प्रवासासाठी जी व्हॅगनची सोय करण्यात आल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे, तर गायिकेला ऑस्ट्रेलियाला येण्याआधील 100 टक्के रक्कम देण्यात आली असल्याचं स्पष्ट केलं.

नेहाच्या कार्यक्रमासाठी चाहत्यांनी प्रतिसाद न दिल्यानं आयोजकांनाच 500,000 AUD चा आर्थिक फटका सहन करावा लागल्याची वस्तूस्थिती त्यांनी समोर मांडली. आयोजकांकडून करण्यात आलेली ही भांडाफोड पाहता आता यावर गायिका नेमकी काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हेही वाचा :

तारतम्य भाव नसलेले काही बालिश राजकारणी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

महागडे सनस्क्रीन वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ गुणकारी पदार्थ