आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(BJP leaders) महायुती एकत्रितच लढेल अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या नवनीत राणांनी मात्र, निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच एकला चालो रे भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे.

त्यामुळे एकीकडे फडणवीस आगामी काळातील निवडणुका महायुती एकत्रित लढवेल असे सांगत असताना मात्र, दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. राणांच्या भूमिकेनंतर आता महायुतीत अन्य मित्र पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अमरावती महानगरपालिका भाजप(BJP leaders) एकट्याने लढवणार आहे. कोणत्याच पक्षासोबत युती करणार नाही, असं नवनीत राणा यांनी थेट स्पष्ट केलंय. ही घोषणा करून त्यांनी एका प्रकारे या निवडणुकीसाठी रणशिंगच फुंकले आहे. अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर फक्त भगवा आणि भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय.
हेही वाचा :
उन्हाळ्यात नॉन व्हेजसोबत हे 5 पदार्थ खाल्ल्यास उष्मघाताच्या समस्या होणार नाही
Swiggy-Zomato वरून जेवण मागवणं झालं महाग, या ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार
भारताच्या राजकारणातील सर्वोत मोठी ब्रेकिंग न्यूज! मोठा पक्ष फुटला