थरारक! रस्ता ओलांडताना महिलेचा उडाला गोंधळ ; भरधाव रिक्षाची धडक बसली अन्… , Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे भयावह व्हिडिओ असतात की पाहून अंगावर काटा येतो. अलीकडे थराराक अपघातांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेच्या भीषण अपघात झाला आहे.

रस्ता ओलंडताना दोन महिलांचा गोंधळ झाला, त्यापैकी एका महिलेचा भीषण अपघात झाला आहे. एका भरदाव वेगात येणाऱ्या रिक्षाने महिलेला धडक दिली आहे. रस्ता ओलांडताना महिलेला रिक्षा पाहून मागे जावे की पुढे हे लक्षात आले नाही. यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाच्या चालकाने ब्रेक मारला पण रिक्षा पलटी होऊन महिवलेवर पडली. सध्या या थरारक घटनेचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, दोन महिला रस्ता ओलांडत आहेत. याच वेळी एक महिला रस्ता ओलांडताना गोंधळेली दिसत आहे. अचानक एका बाजूने एक रिक्षा भरधाव वेगात येते. रिक्षाचालक ब्रेक मारायचा प्रयत्न करतो. पण रिक्षा पलटी होते. पलटी होऊन रिक्षा महिलेच्या अंगावर पडते. ही घटना पाहून रस्तावर असलेल्या लोकांची धावपळ होते. अनेकजण महिलेच्या मदतीसाठी दाव घेतात. रिक्षा काही प्रवासी देखील बसलेले असतात. इतर लोक रिक्षातील प्रवासी आणि त्या महिलेला बाजूल नेण्यास मदत करतात.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @shivam_kush0001 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या फतेहबादमध्ये ही थरारक घटना घडली आहे. याचा सीसीटीव्हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अनेकांनी रिक्षाचालकाला चुकीचे म्हटले आहे. त्याच्या रिक्षाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :

बंगळुरु विरुद्ध कोलकाता सामना रद्द 

टीम इंडियाची Asia Cup मधून माघार! पाकिस्तानशी BCCI ने सर्व क्रिकेट संबंध तोडले.. 

राज्यातील शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी बातमी समोर!