दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांना मुंबई पोलिसांना मिळालेल्या एका ई-मेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉटेल ताजमहाल पॅलेसवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. चौकशीनंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सकाळी विमानतळ पोलिस ठाण्याला हा ई-मेल मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळ तसेच ताज हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. असे असताना आज (19 मे) पुन्हा एकदा मुंबईला बॉम्बस्फोटची(bomb blast) धमकी देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर मुंबईत मोठ्या बॉम्बस्फोटाचा(bomb blast) धमकीचा फोन आला आणि तेव्हापासून पोलिस हाय अलर्टवर आहेत. मुंबई पोलिसांना ‘डायल-112’ आपत्कालीन क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीने फोन करून “मुंबई बॉम्बस्फोटांनी उध्वस्त केली जाणार आहे” असा इशारा दिला. आपल्या नावाची “राजीव सिंह” अशी माहिती देत त्या व्यक्तीने जे. जे. मार्ग परिसरात ‘काही संशयित लोक घुसले’ आणि ‘स्फोटाचा कट आधीच ठरलेला’ असल्याचा दावा केला. राजीव सिंह नावाच्या व्यक्तीने ही माहिती पोलिस हेल्पलाइन नंबरवर दिली, त्यानंतर स्थानिक पोलिस आणि बॉम्ब स्क्वॉड टीमला सतर्क करण्यात आले, परंतु तपासानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही, तसेच अफवा पसरवल्याबद्दल राजीव सिंग नावाच्या कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीच्या कॉलची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि बॉम्ब स्क्वॉड टीमला सतर्क करण्यात आले, परंतु तपासानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही. सध्या राजीव सिंग नावाच्या कॉलरविरुद्ध अफवा पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी, या वर्षी ११ फेब्रुवारी रोजी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. मुंबईच्या वांद्रे जीआरपीला धमकीचा फोन आला. अज्ञात फोन करणाऱ्याने सांगितले की चेंबूर पोलीस स्टेशन बॉम्बने उडवले जाईल. यानंतर लगेचच कॉलरने कॉल डिस्कनेक्ट केला. वांद्रे जीआरपीने एटीएस, बॉम्ब स्क्वॉड आणि स्थानिक पोलिस स्टेशनला धमकीच्या फोनची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून पोलिस स्टेशनची झडती घेतली. तथापि, त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही.
यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील मयूर विहार येथील अल्कॉन इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. अल्कॉन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांनी पांडव नगरच्या एसएचओला फोनवरून कळवले की शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. यानंतर, प्रकरणाची माहिती नियंत्रण कक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
माहिती मिळताच पूर्व जिल्ह्याच्या बॉम्ब(bomb blast) निकामी पथकाला कळवण्यात आले आणि एसएचओ पांडव नगर पोलिस पथकासह शाळेत पोहोचले. यादरम्यान त्यांनी शाळेच्या परिसरातही झडती घेतली. तथापि, शाळेतून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांत देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी धमकीचे फोन कॉल आल्याचे प्रकार समोर आले आहेत, जे नंतर अफवा असल्याचे सिद्ध झाले.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल, वस्तू वा व्यक्ती दिसल्यास तातडीने १०० किंवा ११२ वर माहिती द्यावी, असे सांगितले. बनावट कॉल किंवा अफवा पसरवल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल, याचीही आठवण त्यांनी करून दिली. तसेच १९९३ चे साखळी बॉम्बस्फोट, २००६ लोकल ट्रेन स्फोट, २००८ ची २६/११ दहशतवादी हल्ले अशा घटनांनंतर मुंबईचे सुरक्षा व्यवस्थापन अधिक सजग करण्यात आले आहे. त्यामुळे असे धमकीचे फोन अत्यंत गांभीर्याने घेतले जातात, जरी ते अखेरीस ‘हॉक्स कॉल’ ठरले, तरीही तपासाची पूर्ण शृंखला राबवली जाते.
हेही वाचा :
आठवले यांची पुन्हा एकदा आरपीआय एकत्रीकरणाची साद
70 वर्षांच्या स्टारचा 42 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन…
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत…? कसला आनंदोत्सव….? प्रकाश आंबेडकरांचे खरमरीत टीकास्त्र