कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बाल मनावर लादली जाणार असलेल्या हिंदी भाषा विषयक काढण्यात आलेला अध्यादेश रद्दबातल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि मग शनिवार दिनांक पाच जुलै रोजीच्या नियोजित मोर्चाचे रूपांतर आता मराठी माणसाच्या जल्लोष सभेत होणार आहे. राज ठाकरे(political issue) आणि उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधित करणार आहेत. तब्बल वीस वर्षानंतर हे दोघेजण एकाच मंचावर येत असल्याने मराठी माणूस या सभेला गर्दी केल्याशिवाय राहणार नाही. या सभेत मराठी माणसाला अभिप्रेत असणारा निर्णय जाहीर केला जाणार नाही पण उबाठा आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीची ही जल्लोष सभा नांदी ठरणार काय?

मुंबई, नवी मुंबई, ठाणे या महानगरामधील हिंदी भाषकांची मते खेचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेचं कार्ड बाहेर काढलं पण त्याचा परिणाम ठाकरे बंधू एकत्र येण्यात झाला. आणि नेमकं भाजपला(political issue) ते नको होतं. आता ठाकरे बंधू यांचा बुद्धिभेद करण्यासाठी त्या दोघांनी एकमेकांवर गेल्या काही वर्षात केलेल्या जहाल टिकेच्या जुन्या व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल केल्या जात आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा मीडिया सेल सक्रिय झाला असल्याचे चित्र दिसते आहे.
शिवतीर्थ या निवासाला कॉफी हाऊस अशा शब्दात हिणवणाऱ्या संजय राऊत यांचा फोन आता राज ठाकरे सहज आणि लगेचच रिसीव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ त्यांनी सर्वकाही विसरून जायचे ठरवलंय असं दिसतंय. उबाठा सेनेकडून अनिल परब आणि मनसे कडून बाळा नांदगावकर हे नजीकच्या काही दिवसात युती संदर्भात प्राथमिक चर्चा करतील. कारण वरळी डोम येथील जल्लोष सभेच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हे दोघेही एकत्रपणे एका वृत्तवाहीनीच्या स्टुडिओ मुलाखत देण्यासाठी गेले होते. वाजत गाजत या!
गुलाल उधळत या! असे आवाहन राज ठाकरे यांनी मराठी माणसाला केले आहे. या सभेत पक्षीय झेंडे असणार नाहीत असेही त्यांनी सांगितले आहे त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे हे सध्या तरी कळावयास मार्ग नाही. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा(political issue) वर्धापन दिन काही दिवसापूर्वी संपन्न झाला त्या वरळी डोम येथे ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने बंदिस्त डोम मध्ये ही सभा होणार असल्याने गर्दीवर मर्यादा येणार आहेत तथापि ही सभा वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह दाखवली जाणार आहे. त्यामुळे ती राज्यभरात सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेमुळे महायुतीमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये जसे अस्वस्थतेचे वातावरण आहे तसेच ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येही आहे. ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी”राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला गर्दी होते मात्र या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही”अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रकारचा सुचित इशाराच दिला होता.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे(political issue) हे एकत्र येत असतील, त्यांची युती होत असेल तर स्वागतच केले पाहिजे अशा प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाना पटोले, हर्षवर्धन संकपाळ वगैरेंनी त्यांच्या एकत्र येण्याचे स्वागत केले आहे. तथापि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची उबाठा सेना यांची युती झाली तर महाविकास आघाडीचा समतोल बिघडणार आहे.

चौथा पक्ष म्हणून मनसेची महाविकास आघाडीत एन्ट्री झाली तर सर्वात मोठी अडचण राष्ट्रीय काँग्रेसची होणार आहे. कारण मराठी माणसाचा मुद्दा त्यांना पचनी पडणारा नाही. आणि राज ठाकरे आपला मुद्दा सोडणार नाहीत. त्यामुळे उबाठा सेनेला महाविकास आघाडी सोडावी लागेल आणि राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली राजकीय जवळीक सोडावी लागेल. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची पक्षीय युती ही स्वतंत्रपणे अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याबद्दलचे दोन्ही अध्यादेश मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांची एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती हिंदी भाषाविषयक अहवाल त्याच्या तीन महिन्यात सरकारला सादर करणार आहे. मात्र हिंदी भाषा सक्ती कोणत्याही स्थितीत खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा ठाकरे बंधूंनी दिला आहे. मात्र इयत्ता पाचवी नंतर हिंदी भाषा अनिवार्य करण्यास कोणत्याच राजकीय पक्षाचा विरोध नाही. पाचवी नंतर हिंदी हे धोरण स्वीकारले तर भविष्यात भाषेवरून वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
हेही वाचा :
पुढील ४ दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार
भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी! कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटावर अभिषेक बच्चनचं थेट उत्तर; म्हणाला, ‘मी पुन्हा लग्न करतोय…’