जवळजवळ प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी आर्थिक (symptoms) संकटाचा सामना करावा लागतो पण, प्रत्येकजण आपल्यासोबत असं होऊ नये यासाठी प्रयत्न करतो. वाढत्या कर्जाचा सापळा कोणालाही अडचणीत आणण्याचे एक कारण आहे. अनेकदा जेव्हा असं घडतं तेव्हा व्यक्ती हळूहळू कर्जाच्या सापळ्यात अडकते आणि त्याला कळत नाही. काही लक्षणांवरून आपल्याला कळू शकते की नजीकच्या भविष्यात आपण कर्जाच्या ओझ्या जात आहोत.

जेव्हा एखादी व्यक्ती जुने कर्ज फेडण्यासाठी वारंवार नवीन कर्ज घेते आणि तेही उच्च व्याजदराने, तेव्हा हे एक गंभीर लक्षण आहे. अशा परिस्थितीत, व्यक्ती घाईघाईने महागडे कर्ज घेऊ लागते, (symptoms) ज्यामुळे एकूण कर्जाचा बोजा आणखी वाढतो. परिणामी केवळ आर्थिक दबावच वाढत नाही तर मानसिक ताणही वाढतो.
तुम्ही जुने कर्ज फेडण्यासाठी सतत नवीन कर्ज घेत असाल तर हे एक धोकादायक चक्र आहे. यामुळे मूळ समस्या कधीच सुटत नाही तर उलट त्या आणखी वाढतात आणि आर्थिक संकटाचं चक्र असंच सुरु राहतं. अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती कर्ज फेडण्याऐवजी फक्त हफ्ते पुढे ढकलते. तुमचे उत्पन्न आणि कर्ज यांच्यातील संतुलन बिघडल्याचे हे संकेत आहेत.तुम्ही वेळेवर कर्जाचा हप्ता भरला नाही तर बँक तुम्हाला दंड आकारते. (symptoms) कर्ज तुमच्या हाताबाहेर जात असल्याचे हे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, दरमहा दायित्व आणखी वाढते पण, मूळ रक्कम तशीच राहते. एखादी व्यक्ती वारंवार EMI किंवा कर्जाची परतफेड करण्यात चूक करते तेव्हा ही परिस्थिती उद्भवते, ज्यामुळे खर्च वाढत राहतो.
हेही वाचा :
भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार
Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट