धक्कादायक! उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू

अभिनेत्री उर्मिला कोठारेबद्दल महत्वाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री रात्री उशिरा शुटिंग संपवून घरी येत असताना तिच्या कारचा(car) अपघात झाला आहे.

मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे. कार अपघातात अभिनेत्रीच्या कारने दोन मजुरांना उडवल्याची माहिती आहे.

कार चालवण्यासाठी तिचा ड्रायव्हर होता. या भीषण अपघातात अभिनेत्री आणि तिचा कार ड्रायव्हर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याची माहिती आहे. त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झालाय.

शुटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा(car) हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात उर्मिलाही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची एअर बॅग पटकन उघडल्याने अभिनेत्रीचा जीव वाचला. असं असलं तरीही तिच्या कारची मात्र विचित्र अवस्था झालेली आहे.

दरम्यान, अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात मुंबईतल्या कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ झाला आहे. या घटनेत मेट्रो स्टेशनच्या खाली काम करत असलेल्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली आहे. त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला शुटिंग संपवून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. कारचा वेग जास्त असल्यामुळे ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वेगवान कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातात अभिनेत्री आणि तिचा कार ड्रायव्हर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या कार अपघातातमध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. उर्मिला कोठारेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायंच तर, उर्मिला कानेटकर ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘दुनियादारी’,’ शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ सह ‘रानबाजार’ सारख्या वेबसीरीजमध्ये तिने काम केले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून तब्बल १२ वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे.

हेही वाचा :

टाटा समूह पुढील ५ वर्षात टाटा ५ लाख नोकऱ्या देणार

“सरपंच हत्या प्रकरण: संभाजीराजेंचा धनंजय मुंडेंवर तीव्र हल्लाबोल!”

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ राज्यात 15 दिवस शाळांना सुट्टी