प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीसोबत रणवीरचा रोमान्स; 20 वर्षांनी आहे लहान

अभिनेता रणवीर सिंहच्या वाढदिवशी 6 जुलै रोजी त्याच्या (famous)आगामी ‘धुरंधर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ प्रदर्शित झाला. या फर्स्ट लूकने सर्वांचंच लक्ष वेधलंय. रणवीरच्या लूकला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन अशी कलाकारांची मोठी फौजच पहायला मिळाली. या फर्स्ट लूकमधील आणखी एका चेहऱ्याने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा चेहरा अभिनेत्री सारा अर्जुनचा आहे.

फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये सारा अर्जुन आणि रणवीर सिंह या दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळतेय. अवघ्या काहीच दृश्यांमध्ये साराने छाप सोडली आहे. ही सारा अर्जुन नेमकी आहे तरी कोण, याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.सारा अर्जुन ही अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे. (famous)मुख्य अभिनेत्री म्हणून ‘धुरंधर’ हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. याआधी साराने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ती काही जाहिरातींमध्येही झळकली होती. दीड वर्षांची असताना साराने एका जाहिरातीत काम केलं होतं. त्यानंतर ती जवळपास 100 जाहिरातींचा भाग बनली.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देइवा थिरुमगल’ या तमिळ चित्रपटातून सारा अर्जुनने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यामध्ये तिने सुपरस्टार विक्रमच्या मुलीची भूमिका साकारली होती.(famous)या चित्रपटासाठी तिने सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार पटकावला होता.मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटामध्येही ती दिसली होती. यामध्ये तिने नंदिनीच्या ऐश्वर्या राय बालपणाची भूमिका साकारली होती. सारा आता 20 वर्षांची असून ती रणवीर सिंहपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर

धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video

‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं