चार मिळावे आणि चार हेतू

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

मंगळवारी नवरात्र उत्सवाची सांगता झाली. त्यानिमित्ताने चार वेगवेगळ्या ठिकाणी चार दसरा मेळावे झाले. विचारांचं सोन उधळण्यासाठी मिळावे हे निमित्त असते. तथापि यंदाच्या चारही मेळाव्यांमध्ये विचारांच्या ऐवजी विशिष्ट हेतू प्रेरित राजकीय भाषणे झाली. कार्यकर्त्यांना त्यातून ऊर्जा काही मिळाली नाही. थोडीशी खळबळ, आरोप प्रती आरोप, जुनेच मुद्दे, राजकीय महत्त्वकांक्षा असे काही या मेळाव्यात ऐकायला मिळाले. कार्यकर्त्यांची पाटी मात्र कोरीच राहिली.

बीडच्या नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मेळावा झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल संशयाचे जाळे विणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्याला पुरावे नव्हते. तर्क संगती नव्हती. एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली पाचशे कोटी रुपये आणले आणि ते त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला आणून दिले. असे तर्क विसंगत वक्तव्य त्यांनी भाषणात केले. एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत (gatherings) त्याबद्दलचा खुलासा करावा असे आवाहनही त्यांनी या मेळाव्यात केले. वास्तविक मनोज जरांगे यांना एकनाथ शिंदे यांनी इतकी प्रचंड रक्कम कशासाठी दिली? त्या मागचा त्यांचा हेतू काय? हे सवाल उपस्थित होतात पण अशी मोठी रक्कम मनोज जरांगे यांनी घेतली अशी गेल्या काही महिन्यात चर्चा झालेली नाही. त्यांचे काही कंत्राटदार मित्र आहेत आणि त्यांची 500 कोटी रुपयांची सरकारकडे असलेली थकीत बिले देण्यास त्यांनी भाग पाडले असे बोलले गेले. ते तर्क संगत आहे पण एकूणच त्यांच्या भाषणात हा एकमेव नवा मुद्दा होता पण त्यातून त्यांना अपेक्षित असलेली मोठी खळबळ उडाली नाही. कारण त्यांच्या या वक्तव्यात कोणतेही लॉजिक नव्हते.

आरक्षण मिळवण्याचा लढा सुरूच आहे. तो थांबलेला नाही. मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही मुंबईला या. मराठा आरक्षणासाठी जे आपणाला साथ द्यायला तयार नाहीत त्यांना 20 29 च्या निवडणुकीत धडा शिकवा. हे जुनेच मुद्दे नवे असल्यासारखे त्यांनी मांडले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या अशी मागणी त्यांनी केली. पण एकूणच या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा त्यांचा हेतू दिसून आला. मुंबईच्या नेस्को सेंटर मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात रामदास कदम तसेच गुलाबराव पाटील या दोघांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. (gatherings) त्यांच्या मालमत्तेची चौकशी सरकारने करावी अशी मागणीच त्यांनी केली. या मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यात आले आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. असा दावा करून शिंदे हेच पुढचे महायुतीचे मुख्यमंत्री असतील किंवा असलेच पाहिजेत असा एकूण या मेळाव्यात त्यांचा सूर दिसून आला. महायुतीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला तसा संदेश पोहोचवण्याचा या मेळाव्याचा हेतू होता की काय असा प्रश्न उपस्थित व्हावा.

शिवाजी पार्कवर नेहमीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेन झी या मध्यम भोवती उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. अमित शहा यांना ते या देशाचे लॉरेन्स बिश्नोई असल्याची टीका त्यांनी केली. गद्दारांना 50 कोटी आणि शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपये. ही विसंगती त्यांनी मांडली. आजच्या जेन झी चे नेतृत्व आदित्य ठाकरे हे करत आहेत. हे त्यांनी या मेळाव्यात अगदी ठरवून सांगितले आहे. कारण शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचाच एकमेव फोटो असलेली होर्डिंग लावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेत आता सब कुछ आदित्य ठाकरे हे बिंबवण्याचा हेतू या मेळाव्यातून आणि होर्डिंग मधून समोर आला आहे.

बीड येथील भगवानगडावर नेहमीप्रमाणेच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला. जातीपातीवर कोणीही मोठा होत नाही. अंतरवाली सराटी हे गाव आता मी दत्तक घेतले आहे आणि या गावाचा सर्वांगीण विकास मी करणार आहे अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली. (gatherings) त्यामागे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्याचा हेतू त्यांचा होता हे लपून राहिलेले नाही. धनंजय मुंडे यांनीही नेहमीप्रमाणेच त्यांच्या राजकीय प्रवासात आडवे येणाऱ्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.एकूणच मंगळवारी चार वेगवेगळ्या ठिकाणी दसऱ्यानिमित्ताने मिळावे झाले. चारही ठिकाणी प्रचंड गर्दी होती. चारही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. पण कुठेही वैचारिक मंथन झाले नाही. राजकीय भाषणेच झाली. पक्ष आणि संघटनेचा पुढचा अजेंडा काय असेल हे सांगितले गेले नाही. प्रत्येक वक्त्याने त्यांचा कोणी जो राजकीय शत्रू आहे त्याला समोर ठेवून भाषणे केली. पण त्यातून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असे म्हणता येणार नाही.

हेही वाचा : 

दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार

पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या दरात अचानक वाढ, किमती किती वाढल्या

पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत नवे उद्योग आणणार