सिडनी: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कसोटी कारकिर्दीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रोहितने जर नजीकच्या काळात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती (retirement)जाहीर केली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, प्रतिभावान आणि फॉर्मात असलेला युवा खेळाडू शुभमन गिल संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
रोहित शर्मा(retirement) सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. पाचपैकी सुरुवातीच्या कसोटी सामन्यात तो दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतरच्या पाच डावांत त्याची सर्वोत्तम धावसंख्या अवघी १० धावा आहे. शास्त्रींच्या मते, रोहित आतापर्यंत मालिकेत पदलालित्याशी झुंजत असून चेंडू थोडा उशिराने खेळत आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत संघाच्या कर्णधाराच्या स्थानाबाबत कोणतीही स्पष्टता न दिल्याने, सिडनी कसोटीसाठी रोहितच्या अंतिम अकरा मधील स्थानाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता शास्त्री यांचे हे विधान आले आहे.
भारताच्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षकपदी असताना शास्त्री यांनी रोहितला पाठिंबा दिला होता. आता या मालिकेत ते समालोचन करत आहेत.
३७ वर्षीय रोहितने कसोटीच्या भविष्याबाबत निर्णय घेतला तर त्याने दणक्यात निरोप घ्यावा, अशी अपेक्षा शास्त्री यांनी ‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये व्यक्त केली. ते म्हणाले, “रोहित त्याच्या कारकिर्दीबाबत निर्णय घेईल. तो त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करेल. पण, जर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण त्याचे वय वाढत आहे आणि त्याचा फॉर्मही खालावला आहे.”
शास्त्री शेवटी म्हणतात की, रोहितने निवृत्तीपूर्वी शेवटची कसोटी जिंकून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करावा. “त्याने (रोहितने) खेळपट्टीवर जाऊन धमाकेदार फलंदाजी करायला हवी. पाचवी कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही एक कसोटी हरला आहात, पण मालिका गमावलेली नाही,” असे शास्त्री म्हणाले.
हेही वाचा :
मविआला अचानक यायला लागला महायुतीचा पुळका…
‘ढेंन टें णा’ गाण्यावर चाहत्यांसह थिरकाला शाहिद कपूर…Video
बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग आणि अल्याड पल्याड फेम अभिनेत्री पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात दिसणार एकत्र, पोस्टरने वेधलं लक्ष!
उद्धव ठाकरे गटावर घाला; माजी महापौरांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश