“मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या…

मुंबईतील (mumbai)जगप्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. हॉटेलमध्ये एकाच मॉडेलच्या दोन गाड्या सापडल्या आहेत, ज्यांच्या नंबर प्लेट्स सारख्याच आहेत.

या घटनेने (mumbai)हॉटेलमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या सापडल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कारण ताज हॉटेल अतिशय संवेदनशील परिसरात आहे. ताज हॉटेल सुरक्षेच्या बाबतीत नेहमीच हाय अलर्टवर असते, त्यामुळे अशी घटना अत्यंत धक्कादायक आहे.

एका कार चालकाने चालान टाळण्यासाठी कारची नंबर प्लेट बदलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मूळ नंबर प्लेट असलेली कारही हॉटेलमध्ये पार्क केलेली आढळून आली. मूळ गाडीच्या मालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (6 जानेवारी) दुपारी एकच्या सुमारास ही दोन्ही वाहने मुंबईतील ताज हॉटेलसमोर उभी असलेली दिसली. त्यानंतर मूळ नोंदणी असलेल्या वाहन चालकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली.

या प्रकरणाची दखल घेत दोन्ही वाहने कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आली, त्यानंतर आता ताज हॉटेलसमोर उभी असलेली दुसरी गाडी कोणाची होती याचा तपास पोलीस करत आहेत.

ताज हॉटेलसमोर उभ्या असलेल्या दोन्ही वाहनांचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही वाहने मारुती सुझुकीची असल्याचे दिसत आहे. यापैकी एक वाहन अर्टिगा आहे. ज्याचा क्रमांक MH01EE2388 आहे. तर मागे उभ्या असलेल्या कारचाही हाच क्रमांक आहे. मात्र, दुसरे वाहन कोणत्या मॉडेलचे आहे हे कळू शकलेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच, कुलाबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही कारची तपासणी सुरू केली. पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्या आहेत. एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या हॉटेलच्या आत कशा आल्या याचा पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे प्रकरण लवकरच उघड होईल, असे ते म्हणाले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, आम्ही एका ड्रायव्हरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे ज्याने सांगितले की त्याने मुंबईतील ताजमहाल हॉटेलजवळ त्याच्या कारप्रमाणेच नंबर असलेली कार पाहिली आहे.

दरम्यान 26 नोव्हेंबर 2008 रोजी या आलिशान हॉटेलवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 600 रुम आणि 44 सूट असलेल्या ताज हॉटेलवर झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक ठार आणि 200 हून अधिक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर ताज हॉटेलभोवती कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :

इंटरनेट नसताना वापरा गुगल मॅप्स

बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड धनंजय मुंडेच? संभाजीराजेंचा अजित पवारांना थेट सवाल: “त्यांना संरक्षण का?”

टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह Champions Trophy ला मुकणार?