सकाळच्या नाश्त्यात चहासोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘क्रिस्पी चीझ बटाटा’

सकाळच्या वेळी पोटभर (breakfast)नाश्ता करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर रोजच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, आप्पे इत्यादी पदार्थ बनवले जातात.

पण नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ(breakfast) खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट क्रिस्पी चीझ बटाटा बनवू शकता. शिवाय हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. बटाटा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बटाटा खाल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया क्रिस्पी चीझ बटाटा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
बटाटा
चीझ
पेरी पेरी मसाला
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:
क्रिस्पी चीझ बटाटा बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे बटाट्यांमधील माती निघून जाऊन बटाटे स्वच्छ होतील.
त्यानंतर त्यांचे गोलाकार पातळ तुकडे करून घ्या. कापून घेतलेले तुकडे पाण्यात ठेवा. अन्यथा बटाटे काळे पडतील.
बटाटे पाण्यातून काढून ताटात काढून घ्या. बटाट्यांवर गार्लिक बटर, पेरी पेरी मसाला टाकून ओव्हन ट्रेमध्ये ठेवा.
त्यानंतर वरून तुमच्या आवडीनुसार चीझ टाकून बेक होण्यासाठी ठेवा .
ओव्हनमध्ये बटाटे बेक झाल्यानंतर काढून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गरमा गरम क्रिस्पी चीझ बटाटा.

हेही वाचा :

नववर्षात दागिने खरेदीसाठी तयारी? जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

‘या’ 3 राशींचे भाग्य उजळणार! शुक्र-शनिच्या युतीमुळे सोन्याचे दिवस येणार

‘पुष्पा २’ प्रीमियरच्या घटनेची पुनरावृत्ती; ‘गेम चेंजर’ इव्हेंटमध्ये राम चरणच्या २ चाहत्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?