कर्मदाता आणि न्यायाची देवता म्हणून ओळखले जाणारे शनी महाराज या नवीन वर्षात आपली (zodiac signs)राशी बदलणार आहेत. 29 मार्च 2025 रोजी मीन राशीतून शनीचे भ्रमण होणार आहे. शनिदेव आपली मूळ त्रिकोणी राशि कुंभ राशी सोडून देव गुरु बृहस्पतिच्या धनु राशीत प्रवेश करतील.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2025/01/image-105-1024x1024.png)
शनीचे हे संक्रमण 3(zodiac signs) राशीच्या लोकांसाठी अद्भुत म्हणता येईल कारण ते शनी यावेळी चांदीच्या पावलाने चालणार आहे असं सांगण्यात येत आहे. जेव्हा शनि तांबे किंवा चांदीच्या पावलाने चालतो तेव्हा ते शुभ परिणाम देते.
महर्षि पाणिनी संस्कृत आणि उज्जैनच्या वैदिक विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी सांगितले की, शनि चांदीच्या पावलावर चालत असल्यामुळे कोणत्या राशींना फायदे मिळणार.
शनि गोचर झाल्यानंतर तीन राशींना याचा लाभ मिळणार असल्याचे ज्योतिषाचार्यांनी सांगितले आहे. हा लाभ कोणत्या स्वरूपात असेल आणि कोणत्या राशींच्या नशिबातील गरीबी दूर होणार आहे असा प्रश्न जर तुमच्याही मनात उपस्थित झाला असेल आणि त्यापैकी आपली एक रास आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की वाचा.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप शुभ असणार आहे कारण शनि तुमच्या 9व्या घरात चांदीच्या पायी भ्रमण करेल. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल आणि तुमची अडकलेली कामं पूर्ण होण्यासही यामुळे आधार मिळेल. तसंच तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळतील. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरीची मोठी संधी मिळू शकते. शनीच्या कृपेने तुमचे जीवन आनंदी राहील.
वृश्चिक राशी
मीन राशीतील शनिचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही लाभदायक ठरेल. तुमच्या पाचव्या घरात शनि भ्रमण करेल. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येऊ शकतात. संततीचा आनंद तुम्हाला मिळू शकेल.
हा काळ तुमच्या करिअरसाठी चांगला राहील. वकिली, वैद्यक, अभियांत्रिकीशी संबंधित लोकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक स्पर्धेत तुम्ही यश मिळवू शकता. आर्थिक स्थिती ठीक राहील. गेल्या वर्षभरातील त्रास कमी होतील आणि हे वर्ष तुम्ही सुखाने घालवू शकाल.
कुंभ राशी
शनीचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांना धनवान बनवू शकते. शनि हा मुळात कुंभ राशीचा स्वामी आहे आणि गोचर झाल्यामुळे शनि तुमच्या दुसऱ्या घरात जाईल. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो. तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी अचानक वाढेल. गेले काही वर्ष तुम्ही जे कष्ट केले आहेत त्याचे फळ तुम्हाला नक्कीच यावर्षी मिळेल आणि शनि तुम्हाला चांगले फळ मिळवून देईल. चांदीच्या पावलांनी चालणारा शनि अनेक क्षेत्रांत कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण करेल.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.
हेही वाचा :
‘महिलांना गर्भवती करा अन् कमवा 5 लाख रुपये’, विचित्र ऑफरमुळे शहरात खळबळ
आज लाँच होणार OnePlus चे दोन ब्रँड न्यू स्मार्टफोन!
“मुस्लिम घरात जन्म, पण ब्राह्मण संस्कार; हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा अपूर्ण राहिलेल्या अभिनेत्याची कहाणी