गांधीजींनी कधीही टोपी घातली नाही, पण…PM मोदींनी दिली यशस्वी राजकारणी होण्याची गुरूकिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरोधाचे संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आज संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राजकारणी(politician) व्यक्तीमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले आवश्यक गुण सांगितले आहेत. यामध्ये त्यांनी संवाद, समर्पण आणि लोकांशी जोडलेले राहण्याच्या शक्तीवर भर दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ध्येय असलेले व्यक्ती यशस्वी होतात, तर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने प्रेरित असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात अपयशी ठरतात.

राजकारणात(politician)पाऊल ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिभेबद्दल कामथ यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकारणात प्रवेश करणे सोपे आहे. परंतु, यश मिळवणं हे पूर्णपणे वेगळे आव्हान आहे.

राजकारणातील यशासाठी अत्यंत समर्पण, चांगल्या आणि वाईट काळात लोकांशी सतत संपर्क आणि टिममधील खेळाडू म्हणून काम करण्याची क्षमता आवश्यक असते. जर एखाद्याला असे वाटत असेल की, प्रत्येकजण त्यांचे ऐकेल किंवा त्यांच्या कार्यपद्धतीचे अनुसरण करेल, तर ते चुकीचं आहे. जरी ते काही निवडणुका जिंकू शकत असले तरी, ते एक यशस्वी नेता म्हणून उदयास येतील याची कोणतीही हमी नाही, असं मोदी आज त्यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहेत.

त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आव्हाने आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय स्थितीची तुलना केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात विविध पार्श्वभूमीतील लोकांनी भाग घेतला, विविध प्रकारे योगदान दिले. काहींनी जनतेला शिक्षित केले, काही खादी बनवण्यात गुंतले. अनेकांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी काम केले, तसेच इतर भूमिकाही बजावल्या. तरीही, ते सर्व देशभक्तीच्या समान भावनेने एकत्र आले होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

चांगल्या लोकांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे तर ध्येयाने राजकारणात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं मोदी म्हणालेत. त्यांनी महात्मा गांधींचं उदाहरण दिलंय. ते म्हणाले की, महात्मा गांधी कदाचित उत्तम वक्ते नसतील, परंतु त्यांचं व्यक्तिमत्व आणि लोकांशी असलेले संबंध यांनी देशाला एकत्र आणलं. गांधींनी स्वतः कधीही टोपी घातली नाही, परंतु जगाला ‘गांधी टोपी’ आठवते. खऱ्या संवादाची आणि नेतृत्वाची हीच शक्ती आहे, असं मोदी म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मते, चांगले भाषण देणारे ‘व्यावसायिक राजकारणी’ थोड्या काळासाठी राहू शकतात, परंतु ते जास्त काळ टिकणार नाहीत. भारताला देशाची सेवा करण्याच्या निःस्वार्थ इच्छेने प्रेरित होऊन एक लाख समर्पित तरुण राजकारण्यांची आवश्यकता असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. उद्योजकतेची राजकारणाशी तुलना कशी करावी? असे विचारले असता, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं की उद्योजक त्यांच्या कंपनीच्या वाढीसाठी आणि यशासाठी काम करतात. परंतु, राजकारण हे मुळात राष्ट्राला प्रथम स्थान देण्याबद्दल असते.

हेही वाचा :

नव्या वाहतूक धोरणाची भारतीयांमध्ये चर्चा; असे झाले तर, थेट ‘आयटी’तल्या नोकरीला ठोकणार रामराम

सोनू सूदच्या ॲक्शन लूकने चाहते झाले चकित, साऊथ सिनेमांनाही ‘फतेह’ने दिली टक्कर!

लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांसाठी गूड न्यूज; शस्त्रक्रियेविना होणार उपचार