मुंबईत शुक्रवारी एका ज्वेलरी फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी सज्ज झाले होते. करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, लक्ष्य आणि मिस इंडिया वर्ल्ड २०२२ सिनी शेट्टी सारखे स्टार्स अजियो लक्स वेकेंड येथे त्यानी ज्वेलरीच्या ‘गिल्डेड अवर’ शोकेससाठी रॅम्पवर(ramp walk) दिसले. करण जोहरचा यावेळेचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. करण आणि शोस्टॉपर सिद्धार्थने रॅम्पवर कसा दाखवला जलवा.
करण जोहरने फॅशन शोमध्ये पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या पोशाखात रॅम्प वॉक(ramp walk) केला. त्याने मोत्यासारखा पांढरा रेशमी शर्ट घातला होता ज्याचे वरचे बटण उघडे ठेवले होते. करण जोहरने पूर्ण लांबीच्या बाही, आरामदायी फिट आणि रुंद कॉलर नेकलाइन आहे. तसेच मिड-राईज पॅन्ट जे स्ट्रेट फिटिंग होते.
सिद्धार्थने या कार्यक्रमात नेव्ही ब्लू सूटमध्ये शोस्टॉपर म्हणून काम केले, ज्यामध्ये शाल लेपल्ससह ब्लेझर, टाय डिटेल, प्लंगिंग व्ही नेकलाइन, फिटिंग सिल्हूट आणि पूर्ण लांबीच्या बाही होत्या. त्याने जॅकेटला मॅचिंग स्ट्रेट-लेग पॅन्ट आणि फ्रंट बटण क्लोजर आणि डिप्ड व्ही नेकलाइन असलेला काळा वास्कट घातला. त्याने नेकपीस आणि हील बूट घालून लूक पूर्ण केला.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि करण जोहर एकत्र स्टेजवर आले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. एवढंच नव्हे तर सिद्धार्थने करणचं जॅकेट काढून ते प्रेक्षकांमध्ये भिरकावलं. करण आणि सिद्धार्थचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. ‘द गिल्डेड ऑवर’ थीम असलेल्या या कार्यक्रमात फॅशन, कला आणि डिझाइन या क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होते. या शोचे फोटो अभिनेत्री मलायका अरोराने इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.
हेही वाचा :
शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल सेल!
‘महिनाभरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येतील’, शिंदे गटातील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ!
चाणक्यनीती! काय बघून पुरुषांजवळ येतात महिला? जोडीदाराच्या शोधात असाल तर…