पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी(good news) आहे! पुणे मेट्रोने प्रवास आता अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी खास सवलत जाहीर केली असून, “एक पुणे ट्रांझिट कार्ड” प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रोने पुणेकरांना खास भेट दिली आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवास भाड्यात मोठी सवलत मिळणार आहे(good news). “एक पुणे ट्रांझिट कार्ड” खरेदी करणाऱ्या पहिल्या ५००० प्रवाशांना विशेष सवलत दिली जाणार आहे. या कार्डसाठी नेहमी ११८ रुपये शुल्क आकारले जाते, परंतु २६ जानेवारी रोजी हे कार्ड केवळ २० रुपयांत उपलब्ध असेल.
हे कार्ड खरेदी करण्यासाठी प्रवाशांना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल. पुणेकरांनी आपल्या जवळच्या पुणे मेट्रो स्थानकाला भेट देऊन हे कार्ड खरेदी करावे, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या कार्डचा वापर करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार प्रवास भाड्यात १० टक्के सवलत मिळेल, तर शनिवार आणि रविवारी तब्बल ३० टक्के सवलत मिळणार आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी मेट्रोचा वापर करावा, या उद्देशाने पुणे मेट्रोने ही खास सवलत प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर केली आहे. या सुविधेमुळे पुणेकर निश्चितच मेट्रो प्रवासाला प्राधान्य देतील.
हेही वाचा :
‘हे’ 5 नियम पाळणाऱ्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही!
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO लाँच करणार हे खास फीचर
रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला; विकेट घेणाऱ्या साडेसहा फुटी बोलरला धू धू धुतला