इचलकरंजी शहरातील सुंदर बाग परिसर सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला असून, तेथील नागरिक आणि खाद्यप्रेमींच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर ठिकाणी गटारातून काढलेली घाण व कचरा(Garbage) रस्त्यावरच टाकलेला असून, त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

या भागात खूप मोठ्या प्रमाणावर खाऊ गाड्यांचे थांबे असून, शेकडो नागरिक दररोज येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र बाजूलाच साचलेली घाण, ओला कचरा(Garbage) आणि त्यातून उठणारी दुर्गंधी यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रो सारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
नगरपालिकेने त्वरित या भागातील कचरा उचलून, निर्जंतुकीकरणाचे काम करावे आणि खाऊगाड्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील अशा महत्त्वाच्या व गर्दीच्या भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या आरोग्य संकटाला सामोरे जावे लागू शकते, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा :
YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर
घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे